नागालँडमध्ये सरकारला पाठिंबा का दिला? शरद पवार यांनी सविस्तरच सांगून टाकलं…

नागालँड मध्ये स्थापन झालेल्या एनडीपीपी आणि भाजप सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिल्याची चर्चा असतांना त्यावर शरद पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

नागालँडमध्ये सरकारला पाठिंबा का दिला? शरद पवार यांनी सविस्तरच सांगून टाकलं...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 3:55 PM

चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : नुकत्याच झालेल्या नागालँडच्या निवडणुकीत एनडीपीपी आणि भाजपला ( NDPP And BJP ) जनतेने कौल दिला आहे. त्यामध्ये एनडीपीपी आणि भाजपने सत्ताही स्थापन केली. त्याच दरम्यान महाराष्ट्रातील दोन पक्षांना तिथे जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे आमदार निवडून आले आहे. यामध्ये संपूर्ण राज्यसह देशात राष्ट्रवादी कॉंग्रेसने ( NCP Sharad Pawar ) दिलेल्या पाठिंब्याची चर्चा होऊ लागली आहे. न मागताही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पाठिंबा का दिला? भाजपसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने नागालँडमध्ये युती केली का? अशी उलट सुलट चर्चा सुरू असतांना यावर स्वतः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये बोलत असतांना स्पष्टीकरण दिले आहे.

शरद पवार यांनी नागालँड येथे आमचा पाठिंबा हा नाही हे स्पष्टकरत असतांना आमचा पाठिंबा हा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे. ते मुख्यमंत्री भाजपचे नाहीत. ते तेथील स्थानिक पक्षाचे मुख्यमंत्री आहे. तिथे काही नागांचेव विषय आहेत म्हणून पाठिंबा दिला आहे.

ते कोणीही विरोधात नाहीये. सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे. आमच्या लोकांशी मी बोललो त्यानंतर त्यांनी सांगितले की एकोपा टिकावा यासाठी सगळे एकत्र आले आहेत. सर्व पक्षांनी एक राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यांचा पाठिंबा भाजपला नाही असेही शरद पवार यांनी म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा होत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका होत होती. त्यामध्ये नागालँड पॅटर्न महाराष्ट्रात येईल का ? याशिवाय पाठिंबा कुणी मागितला होता म्हणत टीका हॉट होती.

त्यामुळे शरद पवार यांनी यापूर्वी फक्त आमचा पाठिंबा भाजपला नाही एनडीपीपीच्या मुख्यमंत्र्यांना असल्याचे म्हंटले होते. त्यावरून शरद पवार यांनी पहिल्यांदाच विस्तृत पणे नागालँड येथे पाठिंबा कुणाला आणि का याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

खरं म्हणजे नागालँडमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तेथील नेत्यांनीही भाजपसोबत सत्तेत जाण्याचा आग्रह केला होता. त्यानुसार नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांच्यासोबत बैठक झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान शरद पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्यापूर्वी राज्याच्या राजकारणात 2019 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्थापन केलेली सत्ता, त्यापूर्वी 2014 साली राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा हे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.