शरद पवार यांच्याकडून नारायण राणेंच्या मुलांवर खरपूस टीका; म्हणाले, माजी मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी अशी…

Sharad Pawar on Nitesh Rane : शरद पवार आज रत्नागिरीत आहेत. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शरद पवार पहिल्यांच कोकणात आले आहेत. रत्नागिरीतील सभेतून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. नारायण राणे यांच्या मुलांवर जोरदार टीका केलीय. वाचा सविस्तर...

शरद पवार यांच्याकडून नारायण राणेंच्या मुलांवर खरपूस टीका; म्हणाले, माजी मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी अशी...
शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 23, 2024 | 1:52 PM

रत्नागिरीतील चिपळूणमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा झाली. 18 वर्षांनंतर शरद पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडण्यात आला, त्याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी प्रक्षोभक विधान केलं. त्याचा शरद पवारांनी जोरदार समाचार घेतला. भाजप नेते नारायण राणे यांच्या मुलांवरही शरद पवारांनी जोरदार टीका केली आहे. सत्ता येते आणि जाते. तेव्हा संयम ठेवायचा असतो. सत्ता असते तेव्हा जमिनीवर पाय ठेवायचा असतो. आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते. काम करत राहायचं असतं, अशा शब्दात शरद पवारांनी सुनावलं आहे.

शरद पवारांची राणेंवर टीका

रत्नागिरी या जिल्ह्यात काय घडलं माहीत नाही. हा जुना जिल्हा आहे. या जुन्या जिल्ह्यात एक मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते. आणि अलिकडे मी बघतो. मीही मुख्यमंत्री होतो. माझ्या घरात एक मुलगी आहे. देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगलं काम करणारी तिचा लौकीक आहे. विनम्रपणा हा लौकीक आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री दिला. त्यांनी माझ्यासोबत काम केलंय. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्ली बोलतात, ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, मी महाराष्ट्रातील इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज त्या लोकांची भाषा, ही कशा प्रकराची भाषा आहे. समाजात सर्व जाती धर्माचे लोक आहेत, असं शरद पवार यांनी सभेत म्हटलं.

“सत्ता डोक्यात जाते तेव्हा…”

भारत हे राष्ट्र सर्व धर्मीयांचं आहे. इथे हिंदू, सीख आणि मुस्लिम आहेत. आणि तुमच्या राज्यातील एका केंद्रीय मंत्र्यांची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीने जाहीर वाक्य करतात त्यांना आवर घातलं जात नाही. उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बोलावं याची काळजी घेतली जाते याचा अर्थ सत्ता डोक्यात गेली आहे. जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा लोक एक होतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही, असं पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

चार दिवसांपूर्वी पुण्यात अपघात झाला. तुम्ही पाहिलं असेल. पुणे पालिकेचा ट्रक पुण्याच्या रस्त्याने जात होता. तो एका खड्डयात पडला. रस्त्याने जाणारा ट्रक रस्त्यात खड्डा तयार होतो, त्यात पडतो. याचा अर्थ या लोकांना कुठं आणि किती भ्रष्टाचार करावा याची मर्यादा राहिली नाही. याची किंमत तुम्हाला चुकवावी लागते. मी गाड्याने प्रवास करतो मला हे माहीत आहे. मी मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटून रस्त्याची माहिती देणार आहे, असंही पवारांनी म्हटलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.