VIDEO: फडणवीसांच्या स्टिंग बॉम्बमधले मोठे साहेब कोण? शरद पवारांनीच खुलं खुलं सांगितलं, वाचा सविस्तर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या कटाविरोधातील सरकारी वकिलाच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला. फडणवीस विधानसभेत केवळ आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी याबाबतचे पुरावेच विधानसभा अध्यक्षांकडे दिले. फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना देऊन त्यात व्हिडीओ पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काल विधानसभे भाजप नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांच्या कटाविरोधातील सरकारी वकिलाच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला. फडणवीस विधानसभेत केवळ आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी याबाबतचे पुरावेच विधानसभा अध्यक्षांकडे दिले. फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना देऊन त्यात व्हिडीओ पुरावे असल्याचं त्यांनी सांगितलं. महाजन यांना मोक्कामध्ये अडकवण्यासाठी सरकारी वकील षडयंत्रं रचत होता. संबंधित व्यक्तींशी संवाद साधत होता. त्यावेळी मोठे साहेब म्हणून एका मोठ्या नेत्याचं नावही घेत होता. हे मोठे साहेब कोण? हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी स्पष्ट केलं. या व्हिडीओमध्ये मोठे साहेब म्हणून माझा उल्लेख केला आहे. पण या प्रकरणाशी माझा अर्थाअर्थी संबंध नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच शक्तीशाली यंत्रणेशिवाय 125 तासांचं रेकॉर्डिंग होऊच शकत नाही आणि ही यंत्रणा केवळ केंद्र सरकारकडेच आहे, असं शरद पवार यांनी सांगून फडणवीसांच्या आरोपांमधील हवा काढून घेतली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कालच्या आरोपांवर शंका व्यक्त केली. तसेच त्या व्हिडीओत आपला उल्लेख करण्यात आला असून त्याच्याशी आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओतील माहिती खरी आहे की नाही ते सिद्ध झालं पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता-असत्यता तपासेल. त्यात माझंही नाव घेतलेलं दिसतं. मोठे साहेब म्हणून माझा उल्लेख आल्याचं मी ऐकलं. माझं कधी या संबंधात कुणाशी बोलणं व्हायचं कारण नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.
माझा संबंध नाही
व्यक्तिशा या गोष्टीत माझा कुठलाही संबंध नाही. आमची एक तक्रार आहे. कुणी तरी तक्रार करायची आणि त्या तक्रारीतून लोकप्रतिनधींवर वेगवेगळ्या एजन्सीची मदत घेऊन त्यांना नामशेष केलं जात आहे. बंगाल आणि महाराष्ट्रात त्याची संख्या अधिक आहे, असंही ते म्हणाले.
फडणवीस काय म्हणाले?
फडणवीसांनी काल विधानसभेत महाजनांवरील षडयंत्रांचा पर्दाफाश केला होता. तसेच विशेष सरकारी वकील कशा पद्धतीने षडयंत्र रचत होते त्याची माहिती सभागृहाला दिली. तसेच विधानसभा अध्यक्षांना व्हिडीओ पुरावा असलेला पेन ड्राईव्हही दिला. यातील व्हिडीओ क्रमांक 9 आणि 13 मध्ये शरद पवारांचा उल्लेख आला आहे. त्या व्हिडीओतील संभाषण जसेच्या तसे.
व्हिडिओ- 9
अजित पवार सपोर्ट करीत नाही. पर बडे साब सब देख रहे है. कोणी चांगले अधिकारी आहेत का? चार/पाच अधिकार्यांची चांगली नावे असेल तर द्या, असे त्यांनी मला सांगितले.
व्हिडिओ- 13
– साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत. ते कुणाला तरी घरी बोलावून सांगतात. थेट फोन केला तर उगाच स्टेशन डायरीत नोंद नको. पण, शरद पवार यांना संपवायचेच आहे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना. 1 लाख 1 टक्के. गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच. पुढच्यावर्षीपर्यंत काढायचेच आहे. म्हणजे मग फडणवीस संपतो.
संबधित बातम्या:
राहुल कनाल यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत, आयकर विभाग काय कारवाई करणार ?