अजित पवार माझा पुतण्या, राष्ट्रवादीत फूट नाही म्हणत शरद पवार यांनी ‘ती’ शक्यता फेटाळली

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार याना पंतप्रधान होण्याची संधी होती. पण त्यांना पंतप्रधान केलं नाही असे विधान केले होते. त्याबद्दल पवार यांना विचारताच ते जे काही म्हणाले त्याबद्दल त्यांचा विचारा. पण, मला त्यांच्याबरोबर जाऊन पंतप्रधान व्हायचे नाही.

अजित पवार माझा पुतण्या, राष्ट्रवादीत फूट नाही म्हणत शरद पवार यांनी 'ती' शक्यता फेटाळली
SHARAD PAWAR
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 6:31 PM

मुंबई । 13 ऑगस्ट 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला काही प्रश्न विचारले. त्याला आम्ही उत्तर देताना राष्ट्रवादीमध्ये फूट नाही असे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही राजकीय धोरणे आहेत त्यामध्ये भाजपसोबत जाणार नाही असे स्पष्ट आहे. त्यामुळे आम्ही कोणीही भाजपसोबत नाही. मात्र, आमच्यातील काही सहकारी आहेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का? असे प्रश्न काही हितचिंतक करतात. पण, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी स्वच्छ भूमिका सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.

सांगोला येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुंबईमध्ये INDIA ची बैठक आहे. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता मुंबईच्या हॉटेलमध्ये सगळ्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे तीस ते चाळीस नेते इंडियामध्ये एकत्र काम केले पाहिजे या मताने जमणार आहेत. ही बैठक मी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या सगळ्यांनी आयोजित केली आहे. त्या बैठकीच्या आमंत्रण आमच्या तिघांकडून देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

INDIA च्या यापूर्वी ज्या दोन बैठका झाल्या त्यातील काही विषय घेऊन त्यावर अधिक चर्चा करण्याची गरज आहे. काही धोरण ठरवण्याची गरज आहे. त्यासाठी ही मीटिंग होत असून अत्यंत महत्त्वाची बैठक आहे. यातून इंडियाला ताकद मिळेल असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

मोदी यांची चुकीची भूमिका

संसदेत नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. मात्र, यात त्यांनी आतापर्यंत संसदेमध्ये नॉर्थ ईस्ट राज्य आहेत त्यांचा कुठल्याही प्रश्नाला गांभीर्याने बघायचं हा दृष्टीकोन सगळ्यांनी स्वीकारला आहे. त्यात कुणीही राजकीय भूमिका आणत नाही. देशाच्या हिताचे काय आहे ते पाहिलं जातं. पण, प्रधानमंत्री मोदी यांनी जे उत्तर दिलं त्यामध्ये मणिपूरचा उल्लेख केला नाही.

बाकीच्या सर्व चर्चांवर त्यांनी सामान्य जणांच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही. लोकांचे दुखणे यावर काही बोलले नाहीत. पण, राजकीय कसे हल्ले करता येतील ते पाहिले. त्याची ही भूमिका देशाच्या दृष्टीने योग्य नव्हती. सामान्य लोकांना ते पसंत नाही आणि त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील. सामान्य लोक त्यांना सहन करणार नाही असे पवार म्हणाले.

त्यांच्यासोबत जाऊन पंतप्रधान व्हायचे नाही

पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार याना पंतप्रधान होण्याची संधी होती. पण त्यांना पंतप्रधान केलं नाही असे विधान केले होते. त्याबद्दल पवार यांना विचारताच ते जे काही म्हणाले त्याबद्दल त्यांचा विचारा. पण, मला त्यांच्याबरोबर जाऊन पंतप्रधान व्हायचे नाही. आम्ही भाजपच्या विचारधारेच्या चौकटीत बसत नाही असा टोला लगावला.

मी वडीलधारी, अजित माझा पुतण्या…

अजित पवार हा माझा पुतण्या आहे. पवार कुटुंबाचा वडीलधारी म्हणून आणि आता कुटुंबाचा वडील मी आहे. त्यामुळे वडील माणसांना कोणी भेटायला आले तर हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही. अजित पवार यांची आणि माझी भेट ही काही गुप्त भेट नव्हती असे त्यांनी सांगितले.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.