‘माल’ शब्दावरून शरद पवार यांच्याकडून अरविंद सावंत यांची पाठराखण, कानही टोचले

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर यंदा पवार कुटुंबात दिवाळीही फूट पडलेली दिसली, मोठे पवार आणि धाकटे पवार यांचे स्वतंत्र दिवाळी पाडवे शनिवारी साजरे करण्यात आले.

'माल' शब्दावरून शरद पवार यांच्याकडून अरविंद सावंत यांची पाठराखण, कानही टोचले
Sharad pawar
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 1:28 PM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांचा प्रचार टीपेला पोहचला आहे. विविध नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आता प्रचारात नेते अनेकदा पातळी सोडून बोलत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यात दोन्ही नेत्यांचा समावेश आहे. भाजपाने शायना एनसी यांना मुंबादेवी येथून उमेदवारी दिली आहे. या संदर्भात शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी आम्हाला इम्पोर्टे माल नको असे विधान केले होते. त्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी हा महिलांचा अपमान आहे असा आरोप करीत हंगामा केला आहे. या संदर्भात आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रथमच आपले मत मांडले आहे.

शरद पवार आज बारामतीत पारंपारिक पद्धतीने पवार कुटुंबियांच्या पाडावा मेळाव्यात उपस्थित झाले. या मेळाव्याला यंदा अजितदादा आले नाहीत. अजितदादा यांनी यंदा स्वतंत्रपणे पाडवा साजरा केला आहे. यंदा पवार कुटुंबिया दोन स्वतंत्र दिवाळी पाडवे प्रथमच साजरे करण्यात येत आहेत. या वेळी शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलले आहे.शरद पवार म्हणाले की अरविंद यांच्याकडून शब्द इकडचा तिकडे झाला असेल. व्यक्तीगत हल्ला होता असं आपल्याला वाटत नाही असेही शरद पवार या संदर्भात म्हणाले आहेत.

कानही टोचले

शरद पवार पुढे म्हणाले की कारण नसताना निवडणुका समोर असताना वाद निर्माण केला जात आहे. सत्ताधारी पक्षला आपल्याला संधी मिळण्याची शक्यता नाही असे वाटत असल्यामुळे असे प्रश्न उपस्थित करणं सुरु आहे असेही पवार यावेळी म्हणाले.या संदर्भात संवैधानिक संस्थांनी त्यावर भाष्य करणं हे निवडणुका पाहून केलेला उद्योग आहे असेही शरद पवार यांनी सांगितले. मात्र याचवेळी स्त्रियांबद्दल किंवा कुणाबद्दल बोलताना काळजी घ्यावी हे मात्र मला मान्य आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.