Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार आता अजितदादांना कायमचं घरी बसवणार?, सर्वात मोठं विधान काय?; कामालाही लागले

शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी एक सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

शरद पवार आता अजितदादांना कायमचं घरी बसवणार?, सर्वात मोठं विधान काय?; कामालाही लागले
शरद पवार, अजित पवार
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 5:00 PM

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात सध्या सर्वाधिक चर्चेमध्ये कोणता विधानसभा मतदारसंघ असेल तर तो म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वत: अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं आहे.

दुसरीकडे लोकसभेला देखील पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने होते,  सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत झाली. या हायहोल्टेज लढतीमध्ये सुप्रिया सुळे या विजयी झाल्या, तर यावेळी युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये लढत होणार आहे. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यामुळे बारामती विधानसभेची निवडणूक म्हणावी इतकी अजित पवार यांच्यासाठी सोपी नसणार आहे.

शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी एक सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांनी आता वीस ते पंचवीस वर्ष काम केलं. त्यामुळे आता पुढे तीस वर्ष काम करू शकेल असं नेतृत्व आपल्याला तयार करायचं आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.  शरद पवार यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्याच्या चेहरा बदलला पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यासाठी नवीन पिढी तयार केली पाहिजे, त्यासाठी आता आम्ही लक्ष घातलं आहे, बारामतीमधून युगेंद्र यांना संधी दिली. राज्यात अनेक ठिकाणी तरुण नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. राज्यात तरुण नेतृत्वाची फळी उभी करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, त्यासाठी तुमची मदत पाहिजे, असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य
'औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच', काँग्रेसच्या नेत्याचं क्तव्य.
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट
सुरेश धस घेणार खोक्या भोसलेच्या कुटुंबाची भेट.
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.