जबाबदारीचं पालन न करणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही: शरद पवार
राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्यसरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत | Sharad Pawar
बारामती: महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले आहे. (Sharad Pawar take a dig at Bhagat Singh koshyari)
बारामती येथे आज पत्रकारांनी शरद पवार यांना राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्यसरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते असेही शरद पवार म्हणाले.
मोदीसाहेब स्वतः ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्यपालांकडून त्यांना अशाप्रकारची अडवणूक होत असल्याची त्यांची तक्रार होती. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावं लागलं हे त्यांच्या राज्यातसुध्दा. महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल करतायत आणि असे असताना केंद्रसरकार बघ्याची भूमिका घेतेय ही गोष्ट चिंताजनक असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल; शरद पवारांचं भाकीत
पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होईल. केवळ आसाममध्ये भाजपची सत्ता राहील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्तविले आहे. (NCP chief Sharad Pawar prediction on upcoming assembly polls in west bengal, kerla, Aasam, Tamilnadu)
ते रविवारी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पाच राज्यांमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल, असा दावा शरद पवार यांनी केला.
‘पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री होतील’
पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे एक राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल, असे शरद पवार यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
पवारांना प्रश्न केला वाझे प्रकरणाबद्दल तर ते काय म्हणाले? देशाच्या राजकारणावर बोलले पण वाझेवर?
आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल; शरद पवारांचं भाकीत
(Sharad Pawar take a dig at Bhagat Singh koshyari)