“…म्हणून बारामतीसाठी युगेंद्रची निवड केली”, शरद पवारांनी सांगितले खरे कारणं

"दोन मुलं असली की एकाने शेती करावी, दुसऱ्याने मिळेल तिथे काम केलं पाहिजे. सरकारने हाताला काम देण्यासाठी काम केलं पाहिजे. कारखानदारी आली की हाताला काम येईल", असेही शरद पवारांनी म्हटले.

...म्हणून बारामतीसाठी युगेंद्रची निवड केली, शरद पवारांनी सांगितले खरे कारणं
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 4:26 PM

Sharad Pawar On Yugendra Pawar : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र प्रचाराच्या सभा रंगताना दिसत आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांची एक सभा पार पडली. यावेळी त्यांनी राजकारणा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यामागची कारण सांगितली. “राज्याचा चेहरा बदलला पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यासाठी नवीन पिढी तयार केली पाहिजे. आम्ही लक्ष घातले. राज्याच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी, या ठिकाणी युगेंद्रची निवड केली. तसे राज्यात अनेक तरुण उभे केले. आम्ही महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची फळी उभी करण्याचा संकल्प केला आहे. तुमची मदत हवी”, असे शरद पवार म्हणाले.

“सत्ताधाऱ्यांचे राज्यावर लक्ष नाही”

“आताच्या सत्ताधाऱ्यांचे राज्यावर लक्ष नाही हे माझं स्पष्ट मत आहे. राज्यावर लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं तर शेती, त्याला पाणी, त्याला बी बियाणं, खतं औषधं, मालाला किंमत या सर्व गोष्टी शेतीसाठी करणं गरजेचं आहे. निव्वळ शेती एकी शेती करणं चालत नाही, पर्यायी शेती करणं कुटुंबासाठी चांगलं नाही. दोन मुलं असली की एकाने शेती करावी, दुसऱ्याने मिळेल तिथे काम केलं पाहिजे. सरकारने हाताला काम देण्यासाठी काम केलं पाहिजे. कारखानदारी आली की हाताला काम येईल”, असेही शरद पवारांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

“कारखानदारीशिवाय पर्याय नाही”

“माझ्याकडे राज्य होतं. तेव्हा मी पुण्याचा विचार केला. पुण्यात फक्त शेती एके शेती करून चालणार नाही हे लक्षात आलं. कारण जिरायत भाग होता. कोकणात अतिवृष्टीचा भाग, जमीन कमी, तिथल्या लोकांचे प्रश्न वेगळे. ते सोडवले पाहिजे. हाताला काम दिलं पाहिजे. हाताला काम द्यायचं कसं आम्ही ठरवलं की कारखानदारीशिवाय पर्याय नाही. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी पिंपरी चिंचवडला औद्योगिक शहर उभं केलं. आज तिथे दहा लाखाच्या आसपास लोक काम करत आहेत. तिथे बजाजच्या गाड्या, लष्कराच्या तोफा तयार होतात. पुण्यासाठी फायदेशीर ठरेल. दौंड, भोर, बारामती आदींचं काय हा प्रश्न होता. त्यावेळी कारखानदारीची जोड द्यायचं ठरवलं”, असेही शरद पवार म्हणाले.

“बारामतीत आम्ही काही कारखानदारी आणली”

“शेतीवरची कारखानदारी महत्त्वाची आहे. बारामतीत आम्ही काही कारखानदारी आणली. आम्ही त्यात लक्ष घातलं. दुधावर लक्ष दिलं. आज इथल्या लोकांचं उत्पन्नाचं साधन दूध आहे. २५ हजार लीटर या भागात दूध तयार होतं. पूर्वी असं कधी व्हायचं का? दूधावर प्रक्रिया करणारी कंपनी आपण इथे आणली. तिथे ८ लाख लीटर दूध तयार होतं. आपल्या भागात मोठ्या प्रमाणात दूध तयार होतं. दुधाची पावडर केली जाते आणि त्यातून चॉकलेट निर्मिती केली जाते. त्यातून हाताला काम मिळत आहे. शेतकऱ्यांना पैसा अधिक मिळत आहे”, असेही शरद पवारांनी म्हटले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.