शरद पवार जयदत्त क्षीरसागर यांच्या गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बीड जिल्ह्याच्या दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर ते अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेले नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या नवगन राजुरी या गावात जाऊन पत्रकार परिषदही घेणार आहेत. जयदत्त क्षीरसागर यांनी या लोकसभा निवडणुकीत जाहीरपणे शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला. पण ते अजूनही राष्ट्रवादीतच आहेत. जयदत्त क्षीरसागर हे […]

शरद पवार जयदत्त क्षीरसागर यांच्या गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बीड जिल्ह्याच्या दुष्काळी भागाची पाहणी करत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर ते अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असलेले नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या नवगन राजुरी या गावात जाऊन पत्रकार परिषदही घेणार आहेत. जयदत्त क्षीरसागर यांनी या लोकसभा निवडणुकीत जाहीरपणे शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला. पण ते अजूनही राष्ट्रवादीतच आहेत.

जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आहेत. पण जिल्ह्यातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी पक्षाविरोधातच भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केल्यानंतर पवार आता स्वतः क्षीरसागरांच्या गावात जात आहेत. बीडपासून जवळच क्षीरसागरांचं राजुरी हे गाव आहे.

क्षीरसागर कुटुंबातही काका-पुतण्याचा संघर्ष आहे. क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीत आहेत. त्यांना बळ देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे संदीप क्षीरसागर हे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणूकच नव्हे, तर यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही क्षीरसागर कुटुंबात वाद पाहायला मिळाला होता.

कोण आहेत जयदत्त क्षीरसागर?

जयदत्त क्षीरसागर हे बीडमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या केसरबाई क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेसमध्ये होते. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत आले. राष्ट्रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळात अनेकदा संधी दिली. देशासह राज्यात भाजपची लाट असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते. जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था आहेत. बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड नगरपालिका, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था क्षीरसागर यांच्या ताब्यात आहेत.

क्षीरसागर कुटुंबात वाद

काका-पुतणे यांचा वाद हा महाराष्ट्राला काही नवीन नाही. ठाकरे घरात पहिली ठिणगी पेटल्यानंतर हा प्रकार दिग्गज नेत्यांच्या घरी सुरु राहिला. यात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांचं घर फुटलं. त्यानंतर जिल्ह्यात मोठा दुसरा धक्का तो म्हणजे क्षीरसागर घराण्याला बसला. पुतणे संदीप क्षीरसागर यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यावरून घरात वाद पेटला तो अद्याप शमलाच नाही. नाराज पुतणे संदीप क्षीरसागर यांची नाराजी वाढतच गेली आणि काकू नाना आघाडी स्थापन करून खऱ्या अर्थाने संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं. पुतण्याला जिल्ह्यातील पक्षातील काही नेत्यांकडूनच जाणिवपूर्वक बळ दिलं जात असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर नाराज आहेत.

संबंधित बातम्या  

राष्ट्रवादीचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागर उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर 

जयदत्त क्षीरसागर भाजपच्या व्यासपीठावर, प्रितम मुंडेंसाठी जाहीर प्रचार   

जयदत्त क्षीरसागरांची फेसबुक पोस्ट  

पंकजांच्या बेरजेच्या राजकारणाला आणखी एक यश, धनंजय मुंडेंना धक्का    

बीडमधील राष्ट्रवादीचा चेहराच भाजपच्या वाटेवर, जयदत्त क्षीरसागर मोठ्या निर्णयाच्या तयारीत  

स्पेशल रिपोर्ट : जयदत्त क्षीरसागर यांचा प्रीतम मुंडेंना पाठिंबा  

जयदत्त क्षीरसागर यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.