शरद पवारांकडून प्रशासन, अधिकाऱ्यांचं कौतुक, सकाळी- सकाळी फोन, पवार उद्या पूरग्रस्त भागात

एकीकडे आज पवार ईडी कार्यालयात जाणार असताना, दुसरीकडे पवारांचं राज्यातील पूरस्थितीकडेही लक्ष आहे.

शरद पवारांकडून प्रशासन, अधिकाऱ्यांचं कौतुक, सकाळी- सकाळी फोन, पवार उद्या पूरग्रस्त भागात
Follow us
| Updated on: Sep 27, 2019 | 9:52 AM

बारामती, (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar ED) हे आज अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने (Sharad Pawar ED) पवारावर गुन्हा दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे स्वत:च ईडी कार्यालयात जाणार आहेत. तशी घोषणा पवारांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

एकीकडे आज पवार ईडी कार्यालयात जाणार असताना, दुसरीकडे पवारांचं राज्यातील पूरस्थितीकडेही (Pune rain) लक्ष आहे. पुणे आणि बारामती परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. पुण्यात तर मुसळधार पावसामुळे जवळपास 14 लोकांचा मृत्यू तर 9 जण बेपत्ता आहेत.

त्या पार्श्वभूमीवर पवारांनी आज सकाळीच बारामतीतील पूरस्थितीची माहिती घेतली. पवारांनी फोन करुन बारामतीतील पूरस्थितीचा आढावा घेतला. इतकंच नाही तर प्रशासन, पदाधिकारी यांनी दाखवलेल्या दक्षतेबद्दल त्यांनी कौतुकही केलं. आज ईडी कार्यालयातील हजेरीनंतर शरद पवार उद्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

लोकसभा निवडणुकानंतर दुष्काळ दौरा

शरद पवारांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. दुष्काळी भागात जाऊन चारा छावण्या, पाण्याचे टँकर, जनावरांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेऊन, त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. एकंदरीत मोठ्या घडामोडी घडल्या तरी शरद पवार हे आपले दौरे रोखत नाहीत हे पुन्हा एकदा दिसून येतं.

पुण्यात जोरदार पाऊस

मुसळधार पावसाने (Pune heavy rain flood) पुण्यातील 14 जणांचा जीव घेतलाय, तर नऊ जण अजूनही बेपत्ता आहेत. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांना फटका बसला. शहरासह ग्रामीण भागातील सखल भागातील घरात पाणी शिरलं होतं. या परिस्थितीनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर पूरग्रस्तांना (Pune heavy rain flood) सुरक्षितस्थळी हलवलं आणि मदतीसाठी एनडीआरएफची पाच पथकं कार्यरत झाली. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष असून सर्व मदत दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

मुंबईत अनेक ठिकाणी जमावबंदी

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर (money laundering sharad pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: आज ईडी कार्यालयात जाणार आहेत. (Sharad Pawar ED office) मात्र, शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याअगोदर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी कलम 144 लागू करत मुंबईत अनेक ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. पवार यांनी स्वत: ईडीसमोर हजर होण्याचा पवित्रा घेतल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. पवार ईडी कार्यालयात जाणार त्यादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांकडून परिसरात गर्दी केली जाऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे.

संबंधित बातम्या  

पुण्यातील मुसळधार पावसाने 14 जणांचा मृत्यू, 9 जण अजूनही बेपत्ता 

LIVE : शरद पवार आज ईडी कार्यालयात हजर होणार, मुंबईत जमावबंदीचे आदेश

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.