शिवेंद्रराजेंच्या गाडीत पुढे पवार, मागे उदयनराजे!
सातारा: एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वैरत्व हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जावळी तालुक्यातील कुडाळमध्ये एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमाला दोन्ही राजे एकत्र आले होते. त्यानंतर आज पुन्हा दोघे एकत्र पाहायला मिळाले. महत्वाचं म्हणजे दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. या गाडीत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
सातारा: एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वैरत्व हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जावळी तालुक्यातील कुडाळमध्ये एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमाला दोन्ही राजे एकत्र आले होते. त्यानंतर आज पुन्हा दोघे एकत्र पाहायला मिळाले. महत्वाचं म्हणजे दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. या गाडीत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही होते.
एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनानिमित्त शरद पवार साताऱ्यात आले होते. यावेळी शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं. तर या गाडीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे हे सुद्धा होते. या एकत्र प्रवासाची चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. हम साथ साथ है असाच संदेशच पवार साहेबांनी या दौऱ्यानिमित्त दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले हे भाजपात जाणार अशी चर्चा होती. मात्र पवारांसोबत तिघांनी एकत्रच प्रवास केल्याने, या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.
ही गाडी शिवेंद्रराजे भोसले यांची होती. त्यांनी स्वत:च्या गाडीतून शरद पवार आणि उदयनराजेंना कार्यक्रमस्थळी नेलं.
शिवेंद्रराजे-उदयनराजेंची यापूर्वीची भेट
यापूर्वी जावळी तालुक्यातील कुडाळमध्ये एका मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमाला दोन्ही राजे एकत्र आले. एकत्र आल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हसतमुखाने हस्तांदोलन करत शाब्दिक चिमटे काढले. खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचा खांदा दाबला. शिवेंद्रराजे यांनीही मोठ्या मनाने त्यांना दाद देत माझा सारखा खांदा का दाबताय? असे म्हणाले. त्यावर दिलखुलासपणे उदयनराजे भोसले यांनी फिटनेस बघत आहे, असा टोला मारला. तर शिवेंद्रराजे यांनीही चाणाक्षपणे माझा फिटनेस कायमच चंगळ असून कधीही प्रात्यक्षिक दाखवायची तयारी असल्याचा टोला लगावला. त्यानंतर दोघेही हसत-हसत मार्गस्थ झाले.
संबंधित बातम्या
VIDEO: साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचा एकाच गाडीतून प्रवास
शिवेंद्रराजे म्हणाले खांदा कशाला दाबताय, उदयनराजे म्हणाले फिटनेस बघतोय
शिवेंद्रराजेंसोबतच्या मनोमिलनावर उदयनराजेंची सूचक प्रतिक्रिया
सातारा लोकसभा : राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध, तरीही राजे साताऱ्यातून लढणारच!