Breaking News : राजीनाम्याचं आधीच ठरलं होतं, ‘या’ दिवशी शरद पवार देणार होते राजीनामा; अजित पवार यांचा गौप्यस्फोट

कधी ना कधी हे होणारच होतं. नवा अध्यक्ष येणारच होता. त्यामुळे पवार साहेबांनी आज हा निर्णय घेतला आहे, असं अजित पवार म्हणाले.

Breaking News : राजीनाम्याचं आधीच ठरलं होतं, 'या' दिवशी शरद पवार देणार होते राजीनामा; अजित पवार यांचा गौप्यस्फोट
राजीनाम्याबद्दल आधीच ठरलं होतं - अजित पवार
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 2:42 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार (Sharad Pawar) यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत महाभूकंप झाला आहे. शरद पवार असा काही निर्णय घेतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण पवार यांनी निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या राजीनाम्याला सर्वांनीच विरोध केला आहे. पवार यांनी अचानक राजीनामा घेण्याचा निर्णय का घेतला? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शरद पवार हे राजीनामा देणार हे आधीच ठरलं होतं, अशी माहिती पुढे येत आहे. स्वत: अजित पवार (Ajit Pawar) यांनीच त्यांच्या भाषणात म्हटलं आहे.

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सर्वांनीच पवार यांना निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला. सर्वांनीच गोंधळ घातला. सर्वच नेत्यांनी भाषण करताना राजीनामा मागे घेण्याचा पवारांना आग्रह धरला. पण पवारांचा हा राजीनामा आधीच ठरलेला होता, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट करून सर्वांनाच धक्का दिला आहे.

समिती योग्य तो निर्णय घेईल

यावेळी अजित पवार यांनीही भाषण केलं. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या. समितीने लोकांचा कौल काय आला ते लक्षात घेऊन पुढच्या गोष्टी ठरवाव्यात. ती कमिटी जे ठरवेल ते मला मान्य आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. कमिटी ही काही बाहेरची नाही. आम्ही सर्व बसू. चर्चा करू. तुमच्या भावना समजून घेऊ. तुम्ही जी भावनिक साद घातली. ती आमच्या लक्षात आली आहे. ती समिती तुमच्या मनातील योग्य तो निर्णय घेईल, असं अजित पवार यांनी सांगितलं.

शरद पवार अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही. असं नाही. एका नेतृत्वाकडे जबाबदारी द्यायची आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनखाली काम करेल. साहेब म्हणजे पार्टी आहे. पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. ते लोकशाहीत लोकांचं ऐकत असतात, असं अजित पवार म्हणाले.

साहेबच म्हणाले भाकरी फिरवायचीय

पक्षाचा अध्यक्ष जो होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखालीच काम करेल. साहेब, अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्यांकाच्या पाठी राहतील, नाही तर नाही, असं तुम्ही का मनात आणता. आपला परिवार असाच राहील. भावनिक होऊ नका. परवाच त्यांनी सांगितलं. भाकरी फिरवायची असते. काकींशी बोललो. त्या म्हणाल्या, साहेब निर्णय मागे घेणार नाही. त्यामुळे तुम्ही पर्याय नाही असं म्हणू नका. अरे साहेब आहेतच ना. साहेबांच्या नेतृत्वात नवा अध्यक्ष येईल. त्याला आपण साथ देऊ. त्यांना पाठबळ देऊ, असं अजित पवार म्हणाले.

कुणीही अध्यक्ष झाला तरी साहेबांच्या जीवावरच पक्ष चालणार आहे. हे सांगायला कोणत्या किडमिड्या जोशीची गरज नाही. पवार साहेब निर्णय घेत असताना नेहमी प्रमुखांना एकत्र बसवायचे आणि चर्चा करायचे. आज साहेबांनी संपूर्ण राजकीय आढावा घेतला. पण त्यांनी नंतर निर्णय जाहीर केला. हा शॉक आहे, असं त्यांनी सांगितलं.

तुम्हाला का नको रे?

सर्वांनी साहेबांसोबत काम केलं आहे. पण काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्या देखत नवं नेतृत्व तयार झालं तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्या नवीन अध्यक्ष झाल्यावर साहेब त्या अध्यक्षाला राजकारणातले बारकावे सांगतील ना. साहेब बोलावतील तेव्हा सर्व येणारच आहेत. साहेब देशात फिरणारच आहे. त्यांचं मार्गदर्शन होणारच आहे, असंही ते म्हणाले.

म्हणून आजची तारीख ठरली

साहेब, सोबत नाही. आता काही खरं नाही… आता काय करायचं… असं भावनिक होण्याचं कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता. कालच 1 मे रोजी ते निर्णय जाहीर करणार होते. पण वज्रमूठची सभा होती. मीडियात तेच चाललं असतं. त्यामुळे 2 तारीख ठरली. त्यामुळे त्यांनी निर्णय जाहीर केला. त्यांच्या मनात आहे तीच गोष्ट करू, असा दावाही त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.