शरद पवार वाद मिटवणार, शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंना एकत्र बसवून तोडगा काढणार

साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra raje bhosale) आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayan raje bhosale) यांच्यातील वादामुळे शिवेंद्रराजे हे पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे.

शरद पवार वाद मिटवणार, शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंना एकत्र बसवून तोडगा काढणार
Follow us
| Updated on: Jul 26, 2019 | 6:13 PM

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन राजेंमधला वाद सोडविण्सासाठी स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुढाकार घेणार आहेत. साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra raje bhosale) आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayan raje bhosale) यांच्यातील वादामुळे शिवेंद्रराजे हे पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वत: पवारांनी वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला

शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्याशी एकत्रित बोलून तोडगा काढण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार आहेत. शिवेंद्रराजे हे राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अनुपस्थित राहिल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात जाण्याच्या हालचालीने पक्षश्रेष्ठी चिंतेत आहेत. त्यामुळेच शरद पवार यांनी पुढाकार घेऊन दोन्ही राजेंमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

शिवेंद्रराजेंची दांडी

साताऱ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra raje bhosale) यांनी मुलाखतीला दांडी मारल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जिल्ह्यात असताना शिवेंद्रराजे (MLA Shivendra raje bhosale) यांनी पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेलाही उधाण आलंय.

राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवले होते. त्यानुसार 13 इच्छुकांनी ऑफलाईन, तर काही इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. त्यामध्ये पक्षाच्या विद्यमान आमदारांपैकी केवळ शिवेंद्रराजे भोसले यांचाच अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे सातारा, जावळीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही बुचकळ्यात पडले आहेत.

संबंधित बातम्या 

शिवेंद्रराजेंनी उमेदवारी अर्जच भरला नाही, अजित पवारांच्या दौऱ्याकडेही पाठ  

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.