शरद पवारांचा शिलेदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग
मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदाराने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आमदार भेटीसाठी आले आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजाभाऊ खरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे अशी माहिती त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का
दरम्यान त्यापूर्वी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. आज शिवसेना ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा महानगर पालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण पुण्यामध्ये शिवसेनेचे एकूण दहा नगरसेवक होते. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला तेव्हा एका नगरसेवकाने उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडे 9 नगरसेवक होते. मात्र त्यातील आता पाच जणांनी शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पाच जणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं आता उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ चार नगरसेवकच राहिले आहेत. महानगर पालिका निवडणुकीच्या आधी हा धक्का बसल्यानं आता शिवसेना ठाकरे गटापुढे मोठं आव्हान असणार आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतीमध्ये या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. मात्र आपण केवळ फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचं आमदार राजाभाऊ खरे यांनी स्पष्ट केलं आहे.