मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सीमा वादाच्या संदर्भात कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी 48 तासांचा अवधी देत कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारला इशारा दिला होता. मात्र, ही वेळ पूर्ण होत असतांना शरद पवार यांचा कर्नाटक दौरा रद्द करण्यात आला आहे. त्याबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे. शरद पवार आणि कर्नाटकमधील मराठी माणसांचे बोलणं झालं आहे. त्यांनी सांगितली कि इथली परिस्थिति शांत झाली आहे. तुम्ही येण्याची गरज नाही. आणि तेथील मराठी माणसालाही शांतता हवी आहे. यामुळे शरद पवार हे सध्यातरी कर्नाटकला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी भाजपसह शिंदे गटाला यावेळी इशारा दिला आहे. तिथला मराठी माणूस शांत बसला याचा अर्थ असं समजू नये की मराठी माणूस षंड आहे, असं आव्हाड म्हणाले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न अधिकच चिघळलेला असतांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला होता.
त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यावर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला आहे.
जितेंद्र आव्हाड मराठी माणूस तिथला शांत झाला आहे, शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर वातावरण बदललं आहे असं म्हंटले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संविधान पदावर असतांना गुंडांची भाषा वापरली आहे, त्यांनी केलेले हे विधान स्क्रिप्टेड असल्याचा दावाही आव्हाड यांनी केला आहे.
मात्र, कर्नाटक येथील मराठी माणसांसोबत कुणीही अन्याय करू नये, सरकारने याबाबत जबाबदारी घ्यावी, आणि असं समजू नये की शांत बसला म्हणून तो षंड आहे असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.