शीतल म्हात्रे Video प्रकरणात नवा ट्विस्ट, राज प्रकाश सुर्वे यांना आरोपी करा, कुणी केली मागणी?

Sheetal Mhatre Video News | शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून आज मोठ्या घडामोडी घडल्या. एकिकडे संजय राऊतांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली तर एवढे दिवस शांत असलेले प्रकाश सुर्वे प्रथमच समोर आले. तर ठाकरे गटाच्या महिला नेत्यांनीही प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला आरोपी करण्याची मागणी केली आहे.

शीतल म्हात्रे Video प्रकरणात नवा ट्विस्ट, राज प्रकाश सुर्वे यांना आरोपी करा, कुणी केली मागणी?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 5:32 PM

मुंबई | शिंदे समर्थक शिवसेना (Shivsena) नेत्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या व्हिडिओ प्रकरण अधिकच चिघळल्याचं दिसून येत आहे. प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज प्रकाश सुर्वे यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या संजना घाडी यांनी केली आहे.  संजय राऊत यांनीदेखील आज या व्हिडिओवरून आज अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली. शीतल म्हात्रे यांचे ठाकरे गटावर आरोप होत आहेत, पण प्रकाश सुर्वे या प्रकरणी गप्प का आहेत, असा सवाल राऊत यांनी केला. त्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनीदेखील आज प्रथमच माध्यमांसमोर पत्राद्वारे भूमिका मांडली. शीतल म्हात्रे या बहिणीसमान असून या प्रकरणामुळे खूप मनःस्ताप होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओचं हे प्रकरण आता नव्या वळणावर येऊन ठेपलंय.

आज काय घडलं?

  • शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवासेना नेते साईनाथ दुर्गेसह सहा आरोपींना बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आले.
  •  प्रदीर्घ सुनावणीनंतर साईनाथ दुर्गेसह 6 आरोपींना बोरिवली कोर्टात 2 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
  •  शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप साईनाथ दुर्गे यांच्यावर करण्यात आला आहे.
  •  साईनाथ दुर्गे यांच्या वकील धनश्री लाड यांनी सांगितले की, पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने ती फक्त दोन दिवसांची दिली आहे.

संजना घाडींची मागणी काय?

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी म्हणाल्या की, दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आज साईनाथ दुर्गे यांची सुटका होईल, असे आम्हाला वाटले होते. मात्र तसे काहीही झाले नाही. चौकशीच्या नावाखाली 17 मार्चपर्यंत पीसी दिली आहे. याचा अर्थ त्यांना हे प्रकरण 19 तारखेपर्यंत खेचायचे आहे. तोपर्यंत एसआयटी स्थापन केली जाईल आणि ती एसआयटीकडे पाठवली जाईल, अशी शक्यता आहे. शीतल म्हात्रे यांचा तो व्हिडिओ एडिट केलाय की नाही, यावरच अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही तो एडिट केलाय अशा आरोपांखाली ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला जातोय.

पोलिसही मंत्रालयाच्या दबावाखाली काम करत असून हा कायदा आणि सुव्यवस्थेचा गैरवापर आहे. राज प्रकाश सुर्वे यांच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ लाईव्ह करण्यात आला होता, नंतर राज प्रकाश सुर्वे यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवरून डिलीट केला होता. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी राज प्रकाश सुर्वे यांची चौकशी व्हायला नको का? राज प्रकाश सुर्वे यांनाही आरोपी बनवण्याची आमची मागणी आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.