शीतल म्हात्रे Video प्रकरण तापलं; आदित्य ठाकरेंचा खास माणूस पोलिसांच्या ताब्यात! ठाकरे गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ!

शीतल म्हात्रे प्रकरणात पोलिसांची तपासचक्रे वेगाने फिरत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतलंय.

शीतल म्हात्रे Video प्रकरण तापलं; आदित्य ठाकरेंचा खास माणूस  पोलिसांच्या ताब्यात! ठाकरे गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 4:58 PM

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे समर्थक माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून आज राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.मुंबई पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतलं आहे. शीतल म्हात्रे (Shital Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ कुणी मॉर्फ केला, यामागील मास्टर माइंड कोण आहे, याचा तपास पोलीस वेगाने करत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आज सकाळपर्यंत साईनाथ दुर्गे मुंबईबाहेर होते. मात्र ते विमानतळावर येताच दहिसर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. साईनाथ दुर्गे हे युवासेनेचे सदस्य आहेत. या प्रकरणात आधीच ‘मातोश्री’चा उल्लेख आला होता, आता थेट आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयालाच ताब्यात घेण्यात आल्याने ठाकरे गटात खळबळ माजली आहे.

ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले

पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांना शीतल म्हात्रे मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी ताब्यात घेतलंय. मात्र ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नाहक या प्रकरणात गोवलं जातंय. त्यांना खोटं ठरवलं जातंय, अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. दहिसर पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतल्यानंतर सदर पोलिस स्टेशनबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. शीतल म्हात्रे तसेच प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

4 जणांना अटक

शीतल म्हात्रे यांच्यासंबंधीचा व्हिडिओ मातोश्री या फेसबुक पेजवरून व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी काल दोघांना अटक केली होती. आज आणखी 2 जणांना अटक केली आहे. अशोक मिश्रा, मानस कुवर, रवींद्र चौधरी आणि विनायक डायरे अशी या चौघांची नावे आहेत. ‘मातोश्री’चे फेसबुक पेज चालवणारा विनायक डायरे यालाही अटक करण्यात आली आहे. चौघांनाही १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याच व्हायरल व्हिडिओने हे प्रकरण आणखी 3 विभागांपर्यंत वाढवले ​​आहे. यापूर्वी आयपीसी कलम 354A, 509, 500, 34, 67A, 67 होती. आता IPC 365, 471 आणि 469 वाढवण्यात आले आहेत.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.