‘माणिकरावांना दिलेला ‘तो’ शब्द मी पूर्ण करु शकलो नाही’, माणिकराव जगतापांच्या निधनानंतर जयंत पाटलांची खंत

माणिकराव जगताप यांच्यासाठी एक महत्वपूर्ण गोष्ट करायची होती. त्यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून आणायचं होतं. आमदारकीचा शब्द मी पूर्ण करु शकलो नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केलीय.

'माणिकरावांना दिलेला 'तो' शब्द मी पूर्ण करु शकलो नाही', माणिकराव जगतापांच्या निधनानंतर जयंत पाटलांची खंत
माणिकराव जगताप यांचं निधन, जयंत पाटलांकडून शोक व्यक्त
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 5:44 PM

नवी मुंबई : महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांचे निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. माणिकराव जाधव यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केलीय. माणिकराव जगताप यांच्यासाठी एक महत्वपूर्ण गोष्ट करायची होती. त्यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून आणायचं होतं. आमदारकीचा शब्द मी पूर्ण करु शकलो नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केलीय. (MLA Jayant Patil expressed grief After the death of former MLA Manikrao Jagtap)

माणिकराव जगताप हे उत्तम संघटक आणि कोकणातील तरुण नेतृत्व होते. लोकांच्या प्रश्नांवर हिरिरीने काम करणारे नेते होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर आपल्याला खूप दुःख झाले. माझी पत्नी आणि माणिकराव जगताप यांनी जिल्हा परिषदेत एकत्र काम केलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो ही प्रार्थना, अशी प्रतिक्रिया आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.

‘माणिकराव जगताप यांच्या अकाली जाण्याने कॉंग्रेसमध्ये मोठी पोकळी’

महाडमध्ये दरडग्रस्तांचे अश्रू थांबत नाहीत तोच महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप उर्फ आबा यांचे अल्पशा आजाराने निधन झालं. आबांच्या निधनाने महाड-पोलादपूर परिसरात शोककळा पसरली आहे. माणिकराव जगताप हे 2004 ते 2009 सालापर्यंत महाड-पोलादपूर मतदार संघाचे विधानसभेचे आमदार होते. तत्पूर्वी त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य तसच उपाध्यक्ष पद भूषवले होते. महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या राजकारणात माणिकराव जगताप यांना मानाचे स्थान होते. सध्या ते रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषवत होते. त्यांची कन्या स्नेहल जगताप या महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आहेत. माणिकराव जगताप यांच्या अकाली जाण्याने कॉंग्रेसमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांनीही त्यांच्या आठवणी जागवल्या.

कोण होते माणिकराव जगताप?

काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष

महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार

महाड नगरपालिकेवर 15 ते 20 वर्ष वर्चस्व

रायगड जिल्ह्यामध्ये सुनिल तटकरे यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान करणारे एकमेव राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख

दक्षिण रायगडमध्ये प्रचंड जनमत असलेले कोकणातील काँग्रेसचे मोठे नेते

माणिकरावांची कन्या स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्षा

काँग्रेसने धडाडीचा व निष्ठावान नेता गमावला: राऊत

रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करणारे माणिकराव जगताप यांच्या निधनाने काँग्रेसने एक धडाडीचा व निष्ठावान नेता गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री व अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

इतर  बातम्या :

5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात भिंत उभारणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक

भाजप-राज ठाकरेंमध्ये नेमकं काय चाललंय? युती होणार की नाही? मुंबईपुरतीच होणार की पुणे, नाशकातही?; वाचा सविस्तर

MLA Jayant Patil expressed grief After the death of former MLA Manikrao Jagtap

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.