महाविकास आघाडीत 21 जागा कशा मिळाल्या?; संजय राऊत काय म्हणाले?

शिंदे गट ही काही खरी शिवसेना नाही. तसं असतं तर त्यांना त्यांच्या सर्व जागा मिळाल्या असत्या. गेल्या वेळी आम्ही भाजपसोबत युती केली तेव्हा २३ जागा लढवल्या. शिंद्यांची शिवसेना खरी असती तर त्यांना २३ जागा सहज मिळाल्या असत्या. पण तो ड्युप्लीकेट माल आहे, त्यामुळे भाजपने त्यांना धूप घातली नाही

महाविकास आघाडीत 21 जागा कशा मिळाल्या?; संजय राऊत काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 4:13 PM

महाविकास आघाडीचं अखेर जागा वाटप झालं आहे. या जागा वाटपात ठाकरे गटाला सर्वाधिक 21 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 17 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही सर्वाधिक जागा मिळवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे सोशल मीडियातून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांना हे नेमकं कसं शक्य झालं? असा सवाल थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर दिलंय. आम्ही ओरिजिनल आहोत, त्यामुळे आम्हाला तेवढ्या जागा मिळाल्या. शिंदेंची शिवसेना खरी नाही. तो तर ड्युप्लिकेट माल आहे. शिंदे गटाची शिवसेना खरी असती तर त्यांना एवढ्या जागा मिळाल्या नसत्या का? असा सवालच संजय राऊत यांनी केला आहे.

‘शिंदे गट ही काही खरी शिवसेना नाही. तसं असतं तर त्यांना त्यांच्या सर्व जागा मिळाल्या असत्या. गेल्या वेळी आम्ही भाजपसोबत युती केली तेव्हा 23 जागा लढवल्या. शिंद्यांची शिवसेना खरी असती तर त्यांना 23जागा सहज मिळाल्या असत्या. पण तो ड्युप्लीकेट माल आहे, त्यामुळे भाजपने त्यांना धूप घातली नाही’, अशी टीका संजय राऊत यांनी केली. आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा पुनरुच्चार राऊत यांनी केला.

यापुढे प्रादेशिक पक्षांचं बोट धरूनच दिल्लीत जावं लागेल

आघाडीच्या जागावाटपात शिवसेनेचा प्रभाव दिसला. 48 पैकी 21 मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे ठेवलेत. याबद्दलही राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना हा महाराष्ट्रातील प्रमुख , प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्षांचं राजकारण हे या देशात राहणार. नरेंद्र मोदींनी कितीही प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला किंवा राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांची कितीही अडचण झाली तरी कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला प्रादेशिक पक्षाचं बोट धरूनच दिल्लीत जावं लागेल, असं राऊत म्हणाले.

आम्ही लोकसभेत कायम चांगला आकडा गाठला. 2019 साली महाराष्ट्रात आमच्या 18 जागा निवडून आल्या. त्यातील 13 जण सोडून गेले. खासदार , आमदार सोडून गेले पण कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत जे घडलं त्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती आहे.

विद्यमान खासदारांच्या जागांवर सध्या चर्चा करायची नाही अशी मविआच्या बैठकीदरम्यान आमची भूमिका होती. काँग्रेसकडे विद्यमान खासदारच नव्हता, अवघा 1 होता. राष्ट्रवादी कडे 4 खासदार होते. 18 जागांवरती आमचा अधिकार आहे, असं त्यांनी नमूद केलं.

राज ठाकरेंना मविआत घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत कारण..

2019 साली राज ठाकरे हे मोदी शाहांविरोधात होते. महाविकास आघाडीची मोट बांधताना तुम्ही अनेक राजकीय पक्षांना एकत्र घेण्यासाठी प्रयत्न केले. राज ठाकरेंना मविआत घेण्यासाठी का प्रयत्न झाले नाहीत ? असा सवाल मुलाखती दरम्यान शिवेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला.

प्रयत्न झाले नाहीत कारण समोरची व्यक्ती सीरियस असावी लागते ना राजकारणामध्ये. राजकारण हा नुसता वेळ घालवण्याचा खेळ नाही ना. आपण महाराष्ट्रात, देशात जनतेसंदर्भात ज्या भूमिका घेतो ना त्याला आपण चिटकून राहिलं पाहिजे, एक विचारधारा असली पाहिजे. लढण्याची इर्षा, संघर्ष करण्याची जिद्द असली पाहिजे. ती दिसत नाही, असे राऊत म्हणाले. मी एकटाच सर्व पुढे घेऊन जाईन. राज ठाकरे यांना एकट्यालाच पक्ष चालवयाचा होता, असे राऊत यांनी नमूद केलं. पण आता ते महायुतीसोबत दिसत आहेत.

राज ठाकरे एका भूमिकेवर ठाम नाहीत

राज ठाकरेंनी गेल्या वर्षांत अनेक भूमिका घेतल्या. ते कोणत्याही एका भूमिकेवर ठामपणे टिकले नाहीत. त्यांची मूळची भूमिका मराठी माणासाला न्याय देण्यासाठी होती. नंतर त्यांनी हिंदुत्वासाठी भूमिका घेतली. काही काळापूर्वी ते म्हणाले, मोदी – शाह हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत, त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, अशी त्यांची भाषणं होती. ती त्यांची भूमिका होती. पण आता अचानक त्याच मोदी-शाहांच्या प्रचारासाठी ते बाहेर पडणार आहेत. हे पाहून लोकांनी काय म्हणायचं ? काय समजायचं ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.