‘गेल्या घरी सुखात रहा’ असं म्हणत दादा भुसे यांचा कुणाला चिमटा, मालेगावातील राजकारण तापलं
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दादा भुसे यांच्यावर टिकेची एकही संधी न सोडलेले अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर भुसे समर्थक टीका करू लागले आहे.
नाशिक : भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश निश्चित झालेल्या आणि शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या विरोधात दंड थोपटलेल्या अद्वय हिरे यांना दादा भुसे चिमटा काढला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात राजकीय आखड्यात दंड थोपटलेल्या अद्वय हिरे यांच्याबद्दल दादा भुसे यांनी दिलेली प्रतिक्रिया नाशिकच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरू लागली आहे. गेल्या घरी सुखी राहा, ज्या ठिकाणचे कुंकू लावले त्या ठिकाणी सुखाने नांदावे असं दादा भुसे म्हणाले आहे. त्यामुळे भुसे यांनी काढलेला हा चिमटा अद्वय हिरे यांच्या राजकीय प्रवासाबद्दल हा टोला असल्याची चर्चा होऊ लागली आहे. हिरे यांच्या कुटुंबाचा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि आता ठाकरे गट असा पक्षीय प्रवास होणार आहे. त्यामुळे हिरे यांच्याबद्दल अवघ्या दोन वाक्यात बोलून गेलेल्या दादा भुसे यांच्या प्रतिक्रियेवरुन राजकीय वातावरण तापलं आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दादा भुसे यांच्यावर टिकेची एकही संधी न सोडलेले अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर भुसे समर्थक टीका करू लागले आहे.
अद्वय हिरे यांच्या सोशल मीडियावरील शिवसेनेच्या विरोधातील पोस्ट आणि मिम्स व्हायरल केल्या जात आहे. त्यातच दादा भुसे यांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.
हिरे कुटुंब संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून सहकार आणि शिक्षण क्षेत्रात कायमचं अग्रेसर राहीलं आहे, त्यांच्याच राजकीय अस्तित्वाला भुसे यांनी काही वर्षांपूर्वी सुरुंग लावलं होतं.
दादा भुसे यांच्या विरोधातील भविष्यातील ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे हेच राहणार असल्यानं आत्तापासूनच भुसे विरुद्ध हिरे असा नवा सामना पुन्हा सुरू झाला आहे.
हिरे आणि भुसे यांच्यातील राजकीय संघर्ष मालेगावात आता नव्यानं रंगू लागला असून अद्वय हिरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावरुन मालेगावमधील राजकीय वातावरण तापलं आहे.