…त्यामुळे आम्हाला योग्य जागा मिळाव्यात, भरत गोगावले यांची मागणी
उद्धव ठाकरे यांचे कॉंग्रेस सोबत जागा फिस्कटले तर ते भाजप सोबत सुद्धा जातील, खेळात आणि राजकारणात अंतिम क्षणी काही होऊ शकते असेही गोगावले यांनी म्हटले आहे.
आम्ही तिन्ही पक्ष तुल्यबळ आहोत, त्यामुळे आम्हाला जागा वाटपात योग्य वाटा मिळायला हवा अशी मागणी एकनाश शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांनी केली आहे.तिन्ही पक्षाकडून जास्तीत जास्त जागा मागण्याचा प्रयत्न आहे. मात्र हा तिडा सोडवण्याचा आमचा प्रयत्न सूरू आहे, विरोधकांचा दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटपचा निर्णय घेत असेल, तर आम्ही दसऱ्याच्या अगोदरच यावर तोडगा काढू, महायुतीची पुन्हा सत्ता आणायची असेल तर कोणीही ताटर भूमिका घेऊ नये असेही गोगावले यांनी सांगितले.आम्ही काल,जे सांगत होतो तेही आताही सांगतोय रायगड जिल्ह्यातील सातही जागा आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
रोहा येथील शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याबाबत आमदार भरत गोगावले यांनी तटकरे कुटुंबियाचे आभार मानले. अशा थोर महापुरुषांच्या पुतळ्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळत असते. अनेक पुतळे जोपासण्याचे काम महाराष्ट्रात होताना दिसते असेही गोगावले यांनी यावेळी सांगितले. गुहागर येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मेहुणा विपुल कदम यांना तिकीट देण्याच्या चर्चेवर रामदास कदम नाराज असल्याचे विचारता या विषयी आपल्या नीट कल्पना नसल्याच गोगावले यांनी सांगितले. परंतू जर रामदास कदम पक्षाच्या हिताची गोष्ट सांगत असतील तर मुख्यमंत्री चार -पाच पाऊले मागे देखील येतील, इच्छा प्रकट करणं काही गुन्हा नाही. याबाबत पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेतील असेही गोगावले यांनी सांगितले.
नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य
निलेश राणे हे कुडाळ मतदार संघातून शिंदे गटाकडून उमेदवारी लढवण्याच्या बेतात आहे.त्यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा सुरु असल्याबाबत विचारले असता गोगावले यांनी आमच्या पक्षात असा निर्णय अजूनही झालेला नाही.यावरुन चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही गोगावले यांनी सांगितले.आम्ही जसे आयोध्या काशी तीर्थयात्रेसाठी हिंदू बांधवांना घेऊन जात असतो त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांसाठी देखील त्यांच्या धर्मस्थळी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो, निवडणुकीच्या तोंडावर नितेश राणे यांनी कडक भडक टीका टाळावी असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
तिन्ही पक्षांना समान वाटा मिळावा
जागा वाटपाबाबत विचारले असता गोगावले यांनी सांगितले की, ‘आम्ही तिन्ही पक्ष तुल्यबल असल्यामुळे आम्हाला व्यवस्थित रित्या हिस्सा मिळावा यासाठी योग्य ती चर्चा करू, तिन्ही पक्षांना समान वाटा कसा मिळेल याकडे आमचे निश्चितपणे लक्ष असेल असेही त्यांनी सांगितले. सुनील तटकरे यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत ते म्हणाले की आम्ही भाग्यवान आहोत की त्या हॅलिकॉप्टरमध्ये सुनील तटकरे नव्हते, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तटकरे हे मोठे नेते असून महायुतीमध्ये त्यांचे मोठ योगदान आहे. हॅलिकॉप्टरच्या दुर्घटनेमध्ये ते सुखरूप बचावले याबाबत आम्ही ईश्वराचे आभार मानतो असेही गोगावले यांनी सांगितले.
जनतेने आम्हाला स्वीकारले, परंतू…
एसटी महामंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर गोगावले यांनी शिवनेरीत सुंदरी नेमण्याच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. यावर ते म्हणाले की आम्ही दिशाहीन असतो तर राज्याचा कारभार सव्वा दोन वर्षे केला नसता. जनतेने आम्हाला स्वीकारले आहे. परंतू विरोधकांनी स्वीकारले नाही अशी टीका गोगावले यांनी केली आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच घेतलेल्या बैठकीत आपण एसटी स्थानकातील राखीव जागेत महिला बचत गटांसाठी स्टॉलचा आणि दवाखान्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतल्याचे गोगावले यांनी सांगितले. महिला सक्षम झाल्या तर कुटुंबाचा सर्वांगीण विकास होतो. घरामध्ये शांतता असेल तर कोणतीच अडचण निर्माण होत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.