ती काय आईची शपथ घेणं आहे काय?; रवींद्र वायकर यांचं संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर
बॅलेट पेपरची काऊंटिंग ही सकाळी 8 वाजता झाली. ती झाल्यावर किती मते मिळाले ते समोर आलं. जेव्हा एव्हीएम चेक केलं. अमोल कीर्तिकर एकने प्लस होते. मशीन हॅक करायची होती तर मी एकने प्लस कसा जाईल ? हजार दोन हजारांनी मी पुढे जाईल. या निवडणुकीत बॅलेट पेपरची मते निर्णायक ठरली. मला बॅलट पेपरने वाचवलं. त्या मतांमुळेच मी निवडून आलो, असं शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितलं.
रवींद्र वायकर हे दगाबाजी करून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारे खासदारकीची शपथ घेऊ नये, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याला शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. खासदारकीची शपथ म्हणजे ती काय आईची शपथ आहे का? साडे चार लाख लोकांनी मतदान केलं आणि कायदेशीर निवडून दिलंय. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या करा. त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण उगाच माझी बदनामी करू नका; असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे.
रवींद्र वायकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. खासदारकीची शपथ म्हणजे ही काही आईची शपथ, वडिलांची शपथ, देवाची शपथ नाही. तुम्ही पराजय मोठेपणाने पचवायला शिकलं पाहिजे. मी पराभूत झाल्यावरही अमोल कीर्तिकर यांना सॉरी म्हटलं. मला कुणाला दुखवायचं नाही. पण मला टार्गेट केलं जात आहे. माझ्या विरोधात निगेटिव्हिटी करण्यात आली आहे. त्यांना मुलाला विधानसभेला उभं करायचं असेल. त्यामुळे माझी बदनामी करण्यात येत आहे, असा आरोप रवींद्र वायकर यांनी केला.
भाजपनेही 400 जागा मिळवल्या असत्या
भाजपने 400 पारचा नारा दिला. त्यांच्या तेवढ्या जागा आल्या नाही. मशीन हॅक झाली असती तर त्यांना असं काही करता आलं असतं ना? मोबाईलच्या माध्यमातून ईव्हीएम हॅक होते हे सिद्ध केलं तर देश नाही जगातही कळेल असं काही होतं म्हणून. आरोप करणाऱ्यांनी खरोखरच प्रुव्ह करावं. कोर्टात जावं. लोकशाही आहे. कोणी कुठेही जावं. मोबाईल हा प्रत्येकाकडे असतो. मोबाईल टॉवर चेक केलं तर मतदान केंद्रात त्या दिवशी किती लोकांकडे मोबाईल होते हे कळेल. पण ते हॅक केलं जातं हे सिद्ध झालं तर त्यातून खूप मोठं काही कळू शकतं, असं रवींद्र वायकर म्हणाले.
एक लाख मतं मोजायची होती
आम्ही टीव्हीवर निकाल पाहत होतो. 5. 41 वाजता 2 हजार 200 मतांनी अमोल कीर्तिकर विजयी झाले असल्याची बातमी टीव्हीवर पाहिली. मला याबाबत निवडणूक आयोगाकडून काहीच कळवलं नव्हतं. त्यामुळे कीर्तिकर विजयी कसे होऊ शकतात याचा संशय आला. त्यामुळे मीही प्रयत्न केला. मी तिथल्या अधिकाऱ्याला विचारलं. काही चॅनलवाल्यांना विचारलं. तर चॅनलवाले म्हणाले सर्वांनी चालवलं. 1 लाखाच्या वर मते मोजायची बाकी होती. तरीही कीर्तिकर विजयी झाल्याची बातमी चालली. मी 6 वाजता मतदान केंद्रात गेलो. तिथल्या अधिकाऱ्यांना निकालाबाबत विचारलं. तेव्हा निवडणूक अधिकारी म्हणाले, आमची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही जाहीर केलं नाही. त्यामुळे तुम्ही बाजूला जाऊन बसा, अशी माहिती वायकर यांनी दिली.
मी वर्कहोलिक, अल्कहोलिक नाही
प्रत्येक टेबलच कॅलक्यूलेशन सुरू असताना 20 उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आत होते. मी आत नव्हतो. तिथे अनेकांकडे मोबाईल होते. टीव्हीवाल्यांकडेही मोबाईल होते. मग त्या सर्वांनी मशीन हॅक केली का?13 दिवसात मी काम केलं. माझं रेप्युटेशन होतं. कामाचा ब्रँड होता. मी वर्कहोलिक आहे. अल्कोहोलिक नाही यांच्या सारखा. माझ्याविरोधात खोटा प्रचार सुरू आहे. तो थांबवा. कोर्टात जायचं तिथे जा. माझं काही म्हणणार नाही, असंही ते म्हणाले.