शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रेंच्या ट्विटवर नेटकऱ्यांसाठी नो कॉमेंट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू मांडत ठाकरे गटाला जोरदार विरोध करणाऱ्या महिलांपैकी एक महिला या शीतल म्हात्रे आहेत.
मुंबई : शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी त्यांच्या ट्विटरवरील (Twitter) कमेंट सेक्शन बंद केले आहे. फॉलो करणाऱ्या व्यक्तींनाच फक्त त्यांच्या ट्विटवर कमेंट करता येणार आहे. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यात गटात शीतल म्हात्रे गेल्या होत्या. त्यानंतर म्हात्रे या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटावर नेहमीच आक्रमक होऊन टीका करतांना दिसून येत आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने झालेल्या भाषणात त्यांनी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या भाषणावर जोरदार टीका केली होती. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेसह समर्थकांवर शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे ट्विट करून जोरदार टीका करतांना दिसून येत आहे. त्यावरच प्रत्युत्तर देण्यासाठी पब्लिक सेक्शनवर अनेक ठाकरे समर्थक देखील तुटून पडतांना दिसत होते. त्यातच शिंदे गटाच्या म्हात्रे यांनी ट्विटरवरील पब्लिकसाठीचे कमेंट सेक्शन बंद केल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू मांडत ठाकरे गटाला जोरदार विरोध करणाऱ्या महिलांपैकी एक महिला या शीतल म्हात्रे आहेत.
ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे यांच्यासह ठाकरे गटावर निशाणा साधण्यासाठी त्या ट्विटरचा वापर करतांना दिसून येत आहे.
नुकतेच दसरा मेळाव्याच्या आणि पक्षाच्या नावासह चिन्ह गोठवल्याच्या मुद्द्यावरून शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर जहरी टीका केली होती.
त्यात त्यांनी म्हंटले होते, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून शिल्लकसेना दूर गेली आहे म्हणूनच पक्षाचे नाव आणि चिन्ह तुमच्यापासून दूर गेले असावे …. विचार गोठले आहेत म्हणूनच कदाचित चिन्ह देखील गोठले असावे….’
याच पार्श्वभूमीवर शीतल म्हात्रे यांच्यावर ठाकरे समर्थकांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात होते, ट्विटरवर ट्विटला कमेंट करत म्हात्रे यांच्यावर निशाण साधला जात होता.
याच कारणामुळे शीतल म्हात्रे यांनी ट्विटरवर कमेंट सेक्शन बंद केल्याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे.