Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाच्या महिला नेत्यांचे ‘बाईपण भारी…’, मुंबईतील 36 विधानसभा गाजवणार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात पहिला कार्यक्रम होणार असून त्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी असे कार्यक्रम घेणार आहोत. महिला सक्षमीकरण करणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे...

शिंदे गटाच्या महिला नेत्यांचे 'बाईपण भारी...', मुंबईतील 36 विधानसभा गाजवणार...
Image Credit source: प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 7:03 PM

मुंबई : 17 ऑगस्ट 2023 | श्रावण महिन्यापासून सुरु होणाऱ्या सणांची मांदियाळी सुरु झाली. रक्षाबंधन, नागपंचमी, दहीकाला, त्यापाठोपाठ येणारे गणेशोत्सव याची तयारी सुरु झाली आहे. गल्लीबोळात मंडप सजू लागले आहेत. दुसरीकडे राजकीय पक्ष आगामी निवडणुकांची तयारी करत आहेत. या निवडणुकांमध्ये महिला वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने ( शिंदे गट ) कंबर कसली आहे. शिवसेना नेत्या आमदार मनीषा कायदे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मुंबईतील महिला वर्गासाठी एक खेळ आयोजित केला आहे. या निर्णयाची माहिती देताना त्या म्हणाल्या, राज्यातील आपले सरकार हे सरकार महिलांबाबत किती जागरुक आहेत याचे उदहरण म्हणजे त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पहिल्यांदाच महिलांना नेते पद दिले आहे. मी असो नीलम गोऱ्हे, भावना ताई गवळी यांना नेते पद दिले, तसेच अनेक महिलांना प्रवक्त्या, उपनेते पद दिले. पक्षात महिलांना महत्वाचे स्थान दिले असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आपल्या राज्यात सणानिमित्त मंगळागौरीचे खेळ खेळले जातात. हे खेळ महाराष्ट्रात खूपच लोकप्रिय आहेत. मंगळागौर खेळाला आता एक सार्वजनिक स्वरूप आले आहे. त्यामुळे मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात आम्ही एक कार्यक्रम घेणार आहोत असे त्या म्हणाल्या.

पारंपारिक खेळ खेळणे यासोबतच महिलांचे एकत्रीकरण करणे हा उद्देश ठेवून मंगळागौर खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने आम्ही महिलांचे समाज प्रबोधन करणार आहोत. तसेच या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर, वकील, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अशा नामांकित महिलांचे सत्कार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

माजी नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी १० वी आणि १२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. याची सुरवात ११७ वॉर्डमध्ये गुणगौरव कार्यक्रम घेऊन केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असताना असे कायर्क्रम एकत्र घेण्याची पद्धत नव्हती. प्रत्येक वार्डाचे नगरसेवक, आमदार त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रमघेत असत. परंतु, आता हे कार्यक्रम घेणार आहोत ते सामुहिक पद्धतीने करणार आहोत, असे सांगितले.

'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना.
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?.
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प
NASA तील भारतीय महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं, कारण ठरले ट्रम्प.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन.
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?
आता अमरावती-मुंबई दोन तासात, आज विमानतळाचं लोकार्पण; काय आहेत फायदे?.