चर्चा तर होणारच! रेड्यांची किंमत ऐकून व्हाल हैराण, मर्सिडीज आणि फरारी पेक्षाही महागडा रेडा…
मर्सिडीज आणि फरारीपेक्षाही अधिक किमतीचा रेडा असल्याने नागरिकांनी रेडा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. शिर्डी येथील एक्स्पोमधील रेडा आकर्षणाचा विषय ठरत आहे.
शिर्डी : जर तुम्हाला कुणी रेडा महाग की कार महाग असा प्रश्न विचारला तर तुम्ही एका क्षणात उत्तर द्याल की कार. कारण लाखांच्याच घरात कारची किंमत असते. रेडा किंवा म्हैशीची किंमत फारतर फार एखाद्या लाखाच्या जवळपास असू शकते. पण तुम्हाला सांगितले की कार पेक्षाही रेडा महाग आहे. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. कोट्यवधी रुपयांचा रेडा आहे. तुम्ही म्हणाल कोट्यवधी रुपयांची कार देखील आहे. हो खरं आहे. मर्सिडीज आणि फरारी या कोट्यवधी रुपयांच्या कार आहे. पण त्याच्यापेक्षा अधिक किमतीचा म्हणजेच तब्बल 12 कोटी रुपयांचा एक रेडा आहे. नुकताच हा रेडा पाहण्यासाठी शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये सध्या सर्वात मोठा पशुधन एक्स्पो सुरू झाला आहे. देशातील विविध जाती प्रजातीची जनावरे येथे पाहायला मिळत आहे. त्यातच एक रेडा भाव खाऊन जात आहे. एक दोन नव्हे तब्बल 12 कोटी रुपयांचा हा रेडा असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
शिर्डीत भरलेला सर्वात मोठा पशुधन एक्स्पो पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. त्यामध्ये एका हरियाणातील स्टॉलवर शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून रेडयापासून जन्मला येणाऱ्या म्हशीबद्दल माहिती घेत आहे.
शिर्डीतील पशुधन एक्स्पोमध्ये जवळपास आठशे प्रजातीचे पशूधन बघायला मिळत असले तरी चर्चा मात्र 12 कोटींच्या रेडयाचीच अधिक होत आहे. संपूर्ण एक्स्पोमध्ये हा इंदर नावाचा रेडा भाव खाऊन जात आहे. त्याच्यापासून जन्मला येणारी म्हैस जवळपास 25 लीटर दूध देते.
हा रेडा हरियाणातील मुऱ्हा जातीचा रेडा आहे. सध्या या एक्स्पोचे आकर्षक ठरताना दिसत आहे. या रेड्याच नाव इंदर ठेवण्यात आले आहे. 12 कोटी रुपयांच्या किमितीचा हा रेडा असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. या रेडयाचे मालक गुरतेन सिंह आहे.
गुरतेन सिंह यांनी माहिती देत असतांना म्हणाले सर्वाधिक किमतीचा हा रेडा आहे. फक्त हरियाणामध्ये या प्रजातीचे रेडे पाहायला भेटतात. या रेडयापासून जन्मला येणाऱ्या म्हशी देखील अधिक किमतीला विकल्या जातात. त्यांच्यापासून जवळपास 25 लीटर दूध मिळत असल्याने दूध उत्पादक व्यावसायिकांची मागणी असते.
भारतात या प्रजातीचे रेडे कमी प्रमाणात असून त्यांची उत्पत्ती वाढवण्यावर भर दिला जातो. हरियाणामध्ये असे रेडे असून त्यांच्या खानपानावर देखील मोठा खर्च होत असतो. शरीरानेही मोठा असल्याने लोक बघत असल्याचे मत सिंह यांनी व्यक्त केले आहे.