घटस्थापनेपासून साई मंदिर भक्तांसाठी खुले, रोज किती भाविकांना प्रवेश मिळणार?

साई संस्थानकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संस्थानच्या नियमावलीनुसार दररोज 15 हजार भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यात 5 हजार भक्तांना ऑनलाईन नोंदणीद्वारे, 5 हजार भक्तांना सशुल्क पासद्वारे तर 5 हजार भक्तांना ऑफलाईन पद्धतीने मोफत दर्शन मिळणार आहे.

घटस्थापनेपासून साई मंदिर भक्तांसाठी खुले, रोज किती भाविकांना प्रवेश मिळणार?
शिर्डी साई बाबा
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 4:46 PM

शिर्डी : घटस्थापनेपासून अर्थात 7 ऑक्टोबरपासून साई मंदिर भक्तांसाठी खुले होणार आहे. या पार्श्वभूमीवर साई संस्थानकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संस्थानच्या नियमावलीनुसार दररोज 15 हजार भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यात सर्व भक्तांना ऑनलाईन नोंदणीद्वारेच मोफत दर्शन मिळणार आहे. दर तासाला दीड हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिणार आहे. (Shirdi Sai Baba Temple will open for devotees from 7 October)

साई मंदिरात दर्शन पास ऑनलाईन पद्धतीनेच दिले जाणार आहेत. 15 हजार भाविकांना ऑनलाईन पास असेल तरच दर्शन मिळणार आहे. ऑफलाईन पास न देण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. वाढत्या कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा व रेस्टॉरंट वगळता सर्व आस्थापना रात्री 8.30 पर्यंतच सुरु राहणार आहेत. तर प्रसादालय बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. online.sai.org.in या वेबसाईटवरुन ऑनलाईन पास घेतल्यावरच दर्शन मिळणार आहे.

मंदिरात फुलं, हार, तसंच प्रसाद आणण्यास मनाई

साईबाबांची काकड आरती, मध्यान्ह आरती, सायंआरती आणि शेजारतीला 80 भाविकांना सशुल्क प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक आरतीला 10 गावकऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 65 वर्षावरील नागरिकांना आणि 10 वर्षाखालील बालकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर सर्व साई भक्तांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. मंदिरात फुलं, हार, तसंच प्रसाद घेऊन जाण्यासही मनाई करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे बाहेरुन येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवासही सुरु करण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानकडून देण्यात आलीय. साई मंदिर प्रशासनाकडून घटस्थापनेला मंदिर सुरु करण्याची तयारी पूर्ण झाली आहे, तशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिलीय.

विश्वस्त मंडळ 19 ऑक्टोबरला पदभार स्वीकारणार

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाला पदभार स्वीकारण्यास अखेर मुहुर्त मिळाला आहे. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत हायकोर्टाने गठित केलेली तदर्थ समिती कारभार पाहणार आहे. त्यानंतर नवीन विश्वस्त मंडळ या समितीकडून पदभार स्वीकारेल. सोमवारी(दि.4 ऑक्टोबर) न्या. रविंद्र व्ही. घुगे आणि न्या. एस. जी. मेहरे यांच्यासमोर सुनावणी झाली असता, खंडपीठाने याविषयीचे वरील आदेश दिले.

न्यायालयाने मंडळाचे अधिकार गोठवले

या 16 सप्टेंबर रोजी बारा सदस्यीय नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले. या मंडळात अध्यक्ष आशुतोष काळे आणि उपाध्यक्ष अ‍ॅड. जगदीश सावंत यांच्यासह नऊ सदस्य आणि एक पदसिद्ध सदस्य आहे. यापूर्वी 24 सप्टेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठाने कार्यरत तदर्थ समितीकडून कारभार हस्तांतरण न करता नवीन विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारत कारभार सुरु केल्याचे मत व्यक्त करत मंडळाचे अधिकार गोठवले होते. सोमवारी सुनावणीदरम्यान खंडपीठाने 24 सप्टेंबर रोजीचा अंतरिम आदेश 19 आॅक्टोबर रोजीच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत कायम ठेवला आहे. तोपर्यंत तदर्थ समिती कामकाज पाहील. प्रकरणात याचिकाकर्त्याला नवीन याचिका दाखल करण्याची औरंगाबाद खंडपीठाने मुभा दिली.

विश्वस्त मंडळात कोण-कोण?

1. आमदार आशुतोष अशोकराव काळे – अध्यक्ष 2. अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत – उपाध्यक्ष 3. अनुराधा गोविंदराव अदिक – सदस्य 4. अॅड. सुहास जनार्दन अहेर – सदस्य 5. अविनाश अप्पासाहेब धनवटे – सदस्य 6. सचिन रंगराव गुजर – सदस्य 7. राहुल कनाल – सदस्य 8. सुरेश गोरक्षनाथ वाबळे – सदस्य 9. जयंतराव पुंडलिकराव जाधव – सदस्य 10. महेंद्र गणपतराव शेळके – सदस्य 11. एकनाथ भागचंद गोंदकर – सदस्य 12. सभापती, शिर्डी नगर पंचायत

इतर बातम्या :

Lakhimpur Kheri Violence : सत्तेचा वापर करुन भाजपची दडपशाही, देशातील शेतकरी उत्तर देईल, शरद पवार कडाडले

नाशिक-मुंबई दोन तासांत; गडकरी म्हणतात टेप करून ठेवा, एकही आश्वासन खोटं होणार नाही, पाडला घोषणांचा पाऊस

Shirdi Sai Baba Temple will open for devotees from 7 October

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.