अरे… वडील नटसम्राट, लेक नृत्यसम्राट… ; शीतल म्हात्रेंचा ठाकरे कुटुंबातील ‘या’ व्यक्तीला टोला
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा येत्या 12 जुलै रोजी विवाह होणार आहे. बीकेसी परिसरात हा विवाह सोहळा होत आहे. त्यानिमित्ताने काल अंबानी कुटुंबाने संगीत सेरेमनीचं आयोजन केलं होतं. या संगीत सेरेमनीला देश आणि विदेशातील बड्या हस्ती उपस्थित होत्या. ठाकरे कुटुंबानेही या सोहळ्याला हजेरी लावली होती.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा राधिका मर्चंट हिच्याशी विवाह होत आहे. या निमित्ताने मुंबईत संगीत सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं आहे. या समारोहाला जगभरातून गेस्ट आले आहेत. हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या कलाकारांसह उद्योग आणि राजकारणातील बड्या हस्ती उपस्थित आहेत. ठाकरे कुटुंबानेही या समारंभाला हजेरी लावली. यावेळी या संगीत सेरेमनीत तेजस ठाकरे यांनीही ठेका धरला. तेजस यांच्या नृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून टीकाही केली जात आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तेजस ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीही ट्विट करत टीका केली आहे. शीतल म्हात्रे यांनी तेजस यांचा डान्स करतानाचा हा व्हिडीओही पोस्ट केला आहे. अरे… अंबानींच्या लग्नातला हा background डान्सर ओळखीचा दिसतोय… हे तर टोमणे सम्राटांचे छोटे चिरंजीव, तेजस ठाकरे. उत्तम कला आहे एकेकाजवळ … वडील नटसम्राट … लेक नृत्यसम्राट…, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
अरे… अंबानींच्या लग्नातला हा background डान्सर ओळखीचा दिसतोय… . . हे तर टोमणे सम्राटांचे छोटे चिरंजीव, तेजस ठाकरे … . उत्तम कला आहे एकेकाजवळ … वडील नटसम्राट … लेक नृत्यसम्राट… #एकापेक्षाएक pic.twitter.com/4Li74EstYu
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) July 9, 2024
एक नातू ड्रायव्हर, दुसरा नातू…
दरम्यान, नितेश राणे यांनीही तेजस ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांचा नातू अदानीचा ड्रायव्हर होतो. ठाकरेंचा नातू अंबानीच्या लग्नात नाचतो. एक नातू ड्रायव्हर, दुसरा नातू नाच्या. अन् वर परत गुजरात्यांना शिव्या घालायच्या. आता याला नाच्या ठाकरे असं नाव द्यावं, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली होती.
तगडी फी वसूल
दरम्यान, काल संगीत सेरेमनी अत्यंत दणक्यात पार पडली. या संगीत सेरेमनीला जस्टीन बीबरने जोरदार परफॉर्मन्स देऊन सर्वांची मने जिंकली. मागच्यावेळी पॉपस्टार रिहानाने तिच्या परफॉर्मसाठी 74 कोटी रुपये घेतले होते. जस्टीन बीबरलाही 83 कोटी रुपये फी देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
12 जुलै रोजी लग्न
अनंत आणि राधिका यांचं येत्या 12 जुलै रोजी मुंबईतीलच बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कॉन्वेन्शन सेंटरमध्ये लग्न होणार आहे. त्यामुळे या परिसरातील सर्व हॉटेल्स बुक करण्यात आल्या आहेत. येथील ज्या हॉटेलातील एका रात्रीचं भाडं 13000 रुपये होतं. आता तिथे 91,350 रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, लग्नाला येणारे पाहुणे नेमकं कुठे थांबणार आहेत, याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, हे सर्वजण बीकेसी परिसरातच राहतील असं सांगितलं जात आहे.