जळगावात शिवसैनिक रस्त्यावर; उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ लिहिली रक्ताने पत्र, फुटलेल्या आमदारांही भावनिक साद

| Updated on: Jun 24, 2022 | 4:33 PM

जळगावात ही शिवसैनिक रस्त्यावर उतरून ठाकरे यांना समर्थन देत आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून थेट रक्ताने पत्र लिहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवली आहेत.

जळगावात शिवसैनिक रस्त्यावर; उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ लिहिली रक्ताने पत्र, फुटलेल्या आमदारांही भावनिक साद
पत्र
Image Credit source: tv9
Follow us on

जळगाव : राज्यात शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. तर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी सेनेलाच आवाहन दिले आहे. तर आताचा शिवसेना ही खरी नसून आसाममध्ये एकत्र आलेल्या आमदारांची सेना हीच खरी शिवसेना आहे. जे बाळासाहेबांच्या विचारांवर आणि सेनेच्या कृतीवर चालते अस शिंदे यांनी म्हटलं. त्यानंतर फुटणारी सेना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आपण मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहोत मात्र सगळ्यांनी परत या अशी भावनिक साद घातली. त्यानंतर राज्यात शिवसेनेची खरी ताकद असाणारा सामान्य शिवसैनिक हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे. तर जळगावात शिवसैनिकांनी आपले प्रेम आणि सेनेप्रति असणारी निष्ठा दाखवून दिली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील शिवसैनिकांनी (ShivSainik in Bhadagaon) रक्ताने पत्र लिहून (writing letters with blood) आपले समर्थन हे उद्धव ठाकरे यांना असल्याचे दाखवून दिले. तसेच याचवेळी त्यांनी जे आमदार फुटले आहेत त्यांनाही भावनिक साद घातली आहे. तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांना पुन्हा परत येण्याचे भावनिक आवाहन केले आहे.

भावनिक साद

राज्यात शिंदे यांनी शिवसेनेला भगदाड पाडत शिवसेनाच आपल्याबरोबर असल्याचे दाखवून दिले आहे. तर आता सेना नाही तर शिंदे असेल असेच चित्र निर्माण केलं आहे. त्यानंतर राज्यातील शिवसैनिक चांगलेच गोंधळले आहेत. कारण राज्यात शिंदे यांना मानणारा गट ही आहे. त्यामुले शिवसेना ही फुटू नये म्हणून सामान्य शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे. जळगावात ही शिवसैनिक रस्त्यावर उतरून ठाकरे यांना समर्थन देत आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून थेट रक्ताने पत्र लिहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवली आहेत. तसेच एकनाथ शिंदे व त्यांच्या गटात सहभागी झालेले आमदार यांना परत येण्याची भावनिक सादही रक्ताद्वारे शिवसैनिकांनी पत्रात नमूद केली आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात आंदोलने

दरम्यान सेनेच्या चाळीस पेक्षा जास्त आमदारांनी सत्येविरोधात बंड पुकारल्यामुळे राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. तर शिंदे यांच्या नेतृत्वात बहुतांश आमदार आसाम राज्यातील वगुवाहाटी येथे मुक्कामी असल्याने शिवसेने सोबतच महाविकास आघाडीचे भवितव्य देखील संकटात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थनात तर शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात आंदोलने करण्यात आली आहेत. कोल्हापूर, नागपूर, मुंबई येथेही जोरदार निदर्शने केली आहेत. यावेळी पक्षातील एकही खासदार,आमदार उपस्थित नव्हते.