Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात मोठा राडा; शिवसेना शिंदे गट अन् ठाकरे गट आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

मोठी बातमी समोर येत आहे, ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला आहे, यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ठाण्यात मोठा राडा; शिवसेना शिंदे गट अन् ठाकरे गट आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी
Follow us
| Updated on: Mar 02, 2025 | 6:13 PM

मोठी बातमी समोर येत आहे, ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राडा झाला आहे, यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ठाण्यात पोहोचले, त्यावेळी आनंद आश्रम परिसरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तिथे शिवसेना शिंदे गटाचे नेते देखील पोहोचल्यानं शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजुनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आज ठाण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आहे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी ते ठाण्यात दाखल झाले. मात्र आनंद आश्रम परिसरात येताच तिथे उपस्थित असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आनंद आश्रमात जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, पण आनंद आश्रम कोणत्या तरी खासगी व्यक्तीनं आपल्या नावावर करून घेतला आहे. तो आता दिघे साहेबांचा आश्रम राहिला नाही. मला आश्रचर्य वाटतं की आपल्या नावावर त्यांनी प्रॉपर्टी म्हणून तो करून घेतला आहे,  असं राऊत यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी देखील शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, ज्यांना आपण दैवत मानतो, तिकडे जर कोणत्याही पक्षातील नेते जर नतमस्तक होण्यासाठी येत असतील तर मला असं वाटतं आपण त्यांचं स्वागत करायला पाहिजे, पण यांच्याकडे दुसरे मुद्दे राहिलेले नाहीत, त्यामुळे ते जर म्हणत असतील सगळं आमचंच आहे तर एवढं कमकुवत स्वत: समजत असतील तर ही दुर्दीवी गोष्ट आहे, असं केदार दिघे यांनी म्हटलं आहे.

2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले.
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या.