‘माफी मागा’, राऊतांच्या त्या वक्तव्यावर शायना एन. सी यांचा संताप; सावंतांना पुन्हा सुनावलं

अरविंद सावंत यांनी शायना एन. सी. यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. आता या वादात संजय राऊत यांनी उडी घेतली आहे.

'माफी मागा', राऊतांच्या त्या वक्तव्यावर शायना एन. सी यांचा संताप; सावंतांना पुन्हा सुनावलं
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 7:12 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एनसी यांच्यासंदर्भात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.

मुंबादेवीमध्ये बाहेरचा उमेदवार दिला यावरून टीका करताना त्यांनी  इम्पोर्टेड माल चालणार नाही असं म्हटलं होतं. दुसरीकडे  खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना यामध्ये महिलांचा कोणताही अपमान झाला नसल्याचं म्हटलं आहे. आता यावरून पुन्हा एकदा शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी चांगल्याच आक्रमक झाल्या असून, त्यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.

नेमकं काय म्हणाल्या शायना एन. सी. ?  

हे सुद्धा वाचा

काल अरविंद सावंत जे माझ्याबद्दल बोलले. स्वाभिमानी महिलेला ते माल म्हणतात. अमीन पटेल हसत होते. आज आरविंद सावंत माफी मागतात. तस संजय राऊत म्हणतात की महिलांचा कोणताही अपमान झालेला नाही.  एक खासदार 2014 मध्ये तेव्हा मी त्यांच्यासाठी लाडकी बहीण होते. आता मी इम्पोर्टेड माल आहे. इम्पोर्टेड उमेदवार? असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता, माझा पूर्ण परिवार दक्षिण मुंबईत राहतो. पण काही जण वांद्रेमध्ये राहतात आणि वरळीतून निवडणूक लढवतात असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली. संजय राऊत यांनी सांगावं इथे तुम्ही मला हे सर्टिफिकेट दिलं की मी इम्पोर्टेड माल आहे. यांच्या प्रचारात मी लाडकी बहीण होते. तर आता मी इम्पोर्टेड माल झाले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या मनस्थितीवर प्रश्चचिन्ह उपस्थित होते. संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी माफी मागावी. मुंबा देवीचा आशीर्वाद आहे. मी नेहमी काम करणार. मी एक महिला आहे कोणाची माल नाही. मी मुंबा देवीची मुलगी आहे, लढेल आणि जिंकेल, असं शायना एन. सी. यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.