‘भ्रष्ट नेत्यांचे पुरावे दिले, ईडीने त्याची सुरनळी केली काय?’, सामना अग्रलेखातून टीकेचे आसूड

भाजप'च्याच नेत्याने ईडी वगैरे संस्थांकडे भ्रष्ट नेत्यांचे पुरावे मधल्या काळात दिले आहेत. या नेत्यांवर ईडी अजून कारवाई का करत नाही? असे ज्यांच्याविषयी विचारले जात होते; ते सर्व लोक भाजपवासी झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी त्या पुराव्यांची जणू सुरनकेली आहे का?' असा सवाल करत शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली. आहे.

'भ्रष्ट नेत्यांचे पुरावे दिले, ईडीने त्याची सुरनळी केली काय?', सामना अग्रलेखातून टीकेचे आसूड
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 7:04 AM

मुंबई : ‘मुलुंडच्या तोतऱ्या पोपटाने नेत्याने ईडी वगैरे संस्थांकडे भ्रष्ट नेत्यांचे पुरावे मधल्या काळात दिले आहेत. या नेत्यांवर ईडी अजून कारवाई का करत नाही? असे ज्यांच्याविषयी विचारले जात होते; ते सर्व लोक भाजपवासी झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनी त्या पुराव्यांची सुरनळी केली आहे का?’ असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून केला आहे. तसेच, परदेशातून काळे धन आणायची गर्जना पंतप्रधान मोदी यांनीच केली. या काळय़ा धनवाल्यांनी पीएम केअर्स फंडात गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे. याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे? असा रोखठोक सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची आयकर विभागाने चौकशी केली आहे. या पार्श्वभूमीवर सामनाने ही टीका केली आहे. (shiv sena criticizes bjp and ed in samana newspaper editorial)

राहुल गांधींचे भय शंभर पटीने

सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपवर गंभीर टीका केली आहे. काळय़ा धनवाल्यांनी पीएम केअर्स फंडात गुप्त दान करून स्वतःला शुद्ध करून घेतले आहे. याची चौकशी कोणत्या न्यायालयात होणार आहे?, असा सवाल केला. तसेच, “विरोधी पक्षाशी मतभेद असू शकतात, पण विरोधी पक्षाचा गळा आवळून त्यांचे मृतदेह दिल्लीच्या विजय चौकात लटकवायचे धोरण धक्कादायक आहे. राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत असा प्रचार करूनही श्री. गांधी अद्याप उभेच आहेत. ते मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय हे दिल्लीतील सत्ताधाऱ्य़ांना वाटते. तसे नसते तर ऊठसूट गांधी परिवाराच्या बदनामीच्या शासकीय मोहिमा राबविल्या गेल्या नसत्या, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे. तसेच, लढणारा एकटा असला तरी हुकूमशहाला भय वाटत असते. त्यातही प्रामाणिक योद्ध्याचे भय शंभर पटीने वाढत जाते, असे म्हणत राहुल गांधींविषय़ी वाटणारे भय शंभर पटीतले असल्याचा दावा सामनातून करण्यात आला.

भाजपच्या विरोधात उभं राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविरोधात हल्ला

“गांधी परिवारातील सदस्यांकडून जर खरोखरीच फौजदारी गुन्हे घडले असतील तर त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ नये असे कोणीच म्हणणार नाही. पण जेव्हा अशा तर्‍हेच्या गुन्ह्यांच्या आरोपांचा पद्धतशीर प्रचार होतो आणि फास आवळला जात आहे असली भाषा मुद्दाम पसरविली जाते तेव्हा या हालचालीमधले राजकारण असल्याचे स्पष्ट होते. रॉबर्ट वढेरा हे भाजपच्या टीकेचे नेहमीच लक्ष्य राहिले आहेत. पण गेल्या सहा-सात वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. गांधी परिवाराविरोधात सर्व आयुधे वापरून झाली आहेत. हे फक्त रॉबर्ट वढेरा यांच्याबाबतीत घडतेय असे नाही. भाजपच्या विरोधात उभे राहणाऱ्य़ा प्रत्येक व्यक्तीवर असा हल्ला सुरू आहे,” असा गंभीर आरोप शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून केला आहे. तसेच राजकीय विरोधकांच्या पैशांचे व्यवहार खणून काढले जात आहेत. यामध्ये लिंबू लागला तरी भोपळा हाती आल्याची बोंब मारली जात असल्याची खोचक टीका शिवसेनेने केली आहे.

संबंधित बातम्या :

आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाहीत : गुलाबराव पाटील

(shiv sena criticizes bjp and ed in samana newspaper editorial)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.