शिंदे गटात गेलेल्या बंटी तिदमेंची शिवसेनेने केली कोंडी, ‘त्या’ संघटनेच्या अध्यक्षपदावरून केली हकालपट्टी…
तिदमे यांची राजकीय हालचाल पाहता म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे संस्थापक असलेले शिवसेनेचे मंत्री बबनराव घोलप यांनी तिदमे यांनाच धक्का देत कोंडी केली आहे.
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झालेल्या माजी नगरसेवक बंटी उर्फ प्रवीण तिदमे (Pravin Tidme) यांना शहराची महानगरप्रमुखाची सूत्रे हाती देत शिवसेनेला धक्का दिला होता. बंटी तिदमे हे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्ष पदी होते. हीच संधि शिवसेनेने शोधून तिदमे यांची कोंडी शिवसेनेने केलीय, संघटनेचे संस्थापक असलेल्या बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी तिदमे यांची हकालपट्टी करत शिवसेनेचे महानगरप्रमुख असलेल्या सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली आहे. तिदमे हे नवीन नाशिकमधील माजी नगरसेवक असल्याने त्याच विभागातील आणि शहरातील सेनेचे पहिल्या फळीतील नेते असलेले सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करत शिवसेनेने तिदमे यांची कोंडी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंटी उर्फ प्रवीण तिदमे यांची निवड झाल्यावर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी कोण अशी चर्चा सुरू झाली होती.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निवडीसाठी तिदमे यांनी आयुक्तांना पत्रही दिल्याची माहिती होती, त्यामुळे तिदमे शिवसेनेला शह देण्याच्या तयारीतच होते.
मात्र, तिदमे यांची राजकीय हालचाल पाहता म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे संस्थापक असलेले शिवसेनेचे मंत्री बबनराव घोलप यांनी तिदमे यांनाच धक्का देत कोंडी केली आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत शिवसेनेचे महानगरप्रमुख असलेल्या आणि तिदमे यांच्या विभागात असलेल्या सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली आहे.
शिवसेनेने खेळलेल्या या खेळीमुळे तिदमे यांची मोठी राजकीय अडचण झाली असून शिंदे गटात जाताच शिवसेनेने तिदमे यांना धक्का दिला आहे.
तिदमे यांची राजकीय खेळी पाहता त्यांना खासदार हेमंत गोडसे हे मदत करत असल्याचे दिसून येत आहे, आणि हीच बाब शिवसेनेने ओळखून थेट गोडसे यांनाच धक्का देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.
हेमंत गोडसे यांचे राजकीय विरोधक हे इतर पक्षातील असले तरी शिवसेनेत देखील एक मोठा गट गोडसे यांच्या विरोधात होता, खासदारकीला देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी गोडसे यांना विरोध दर्शविला होता.