पुन्हा भावोजीच! आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती
आदेश बांदेकरांकडे असलेल्या श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’ अर्थात प्रख्यात अभिनेते-सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली आहे. मुंबईतील दादरमध्ये असलेले देशभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचा कारभार पुढील तीन वर्षेही बांदेकरच सांभाळतील. (Shiv Sena Leader Aadesh Bandekar reappointed as Chairman of Sri Siddhivinayak Temple Trust)
आदेश चंद्रकांत बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवार 24 जुलै 2020 पासून पुढील तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. आदेश बांदेकर यांच्याकडे शिवसेनेचे नेतेपदही आहे. श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
Shiv Sena Leader Aadesh Bandekar (in file pic) has been re-appointed as Chairman of Sri Siddhivinayak Temple Trust for another 3 yrs starting from 24th July 2020. This post given to him will continue to be equivalent to Minister of State (MoS) post in Maharashtra govt: State Govt pic.twitter.com/od8j18fjvG
— ANI (@ANI) July 24, 2020
आदेश बांदेकर गेली 16 वर्ष ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. महाराष्ट्रातील घराघरात जाऊन गृहिणींचा सन्मान करण्याचे काम बांदेकर अव्याहतपणे करत आहेत. त्यामुळे प्रत्येक घरातील वहिनींचे ‘लाडके भावोजी’ असे स्थान त्यांना मिळाले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’मधून घरुनच ते शूटिंग करतात. याशिवाय, ताक धिना धिन, एकापेक्षा एक, हप्ता बंद, झिंग झिंग झिंगाट अशा अनेक कार्यक्रमांचे निवेदन त्यांनी आतापर्यंत केले आहे. काही मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला असून ‘सोहम प्रॉडक्शन’ ही निर्मिती संस्था ते चालवतात.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
राजकीय प्रवास
आदेश बांदेकर यांनी सप्टेंबर 2009 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. 2009 च्या विधानसभा निवडणुका त्यांनी माहीम मतदारसंघातून लढवली, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात आपले काम चालू ठेवले. 2012 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा : रक्तदान करायचंय? ‘सिद्धिविनायक मंदिर न्यासा’ची व्हॅन घराखाली येणार
तीन वर्षांपूर्वी (जुलै 2017) आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 2018 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. (Shiv Sena Leader Aadesh Bandekar reappointed as Chairman of Sri Siddhivinayak Temple Trust)