VIDEO: धर्मेंद्र प्रधान यांच्या स्वप्नातली रिफायनरी Nanarमध्ये नक्कीच होणार नाही: विनायक राऊत
नाणार प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या मार्गावर असल्याचं सुतोवाच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. त्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे.
सिंधुदुर्ग: नाणार प्रकल्प (Nanar refinery project) पुनरुज्जीवनाच्या मार्गावर असल्याचं सुतोवाच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. त्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. धर्मेंद्र प्रधान (dharmendra pradhan)यांच्या स्वप्नातली रिफायनरी नाणारमध्ये नक्कीच होणार नाही, असं विधान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. बारसु सोलगावमधील रिफायनरी संदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेऊन रिफायनरी बाबत नंतरच निर्णय व्हावा. जिथे विरोध नसेल तिथे रिफायनरी उभारण्यासंदर्भात शिवसेना अजूनही ठाम आहे. नाणार रिफायनरीचा विषय संपला आहे, अशी शिवसेनेची भूमिकाही विनायक राऊत (vinayak raut) यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे नाणारवरून पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता बळावली आहे. या विषयावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचे नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बारसू आणि सुलगाव इथल्या पंचक्रोशीमध्ये अजूनही नाणारला विरोध आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही देखील सहमत आहोत. रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही, असंही विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं.
पक्षवाढीसाठीच नाणारची बाजू
नाणारच्या माध्यमातून भाजप कोकणात स्वतःला उभ करत आहे. किती लोकांना ते जॉब देणार आहेत हे त्यांनी सांगावं, असं आव्हान शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी भाजपला दिले आहे.
अजित पवारांची सावध भूमिका
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकणात होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना नाणारच्या प्रश्नावर थेट भाष्य केलं नाही. नाणार संदर्भात धर्मेंद्र प्रधान यांची बातमी वाचली. पण मुख्यमंत्र्यांशी बोलून मी अधिकारवाणीनं बोलू शकतो, असं अजित पवार म्हणाले.
संबंधित बातम्या:
VIDEO: ज्यांना उद्योग नाही ते अशी टिप्पणी करत असतात, अजित पवारांनी सुजय विखेंना फटकारलं