आधी बोलले उद्धव ठाकरे यांना सोडायचं नव्हतं, आता अमित शाह यांच्या भेटीला, मंत्री संजय राठोड यांच्या मनात नेमकं काय?

मंत्री संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वीच बीडमध्ये आपल्याला उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नव्हती. पण समाजाच्या विकासासाठी आपल्याला शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं मोठं वक्तव्य केलेलं. त्यानंतर ते आज दिल्लीत दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आधी बोलले उद्धव ठाकरे यांना सोडायचं नव्हतं, आता अमित शाह यांच्या भेटीला, मंत्री संजय राठोड यांच्या मनात नेमकं काय?
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 3:58 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडत आहेत त्यांना सध्याच्या घडीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ 14 जणांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. अर्थात याबाबतच्या घडामोडी एकीकडे घडत असताना दिल्लीत आज वेगळंच काहीतरी बघायला मिळालं आहे. महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आज चक्क दिल्लीत दाखल झाले आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार ते आज अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राठोड यांनी दिल्लीत पोहोचल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

मंत्री संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वीच बीडमधील कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं होतं. राज्यात सत्तांतर झालं त्यावेळी आपल्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहायचं होतं. पण धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा सल्ला दिला होता. पोहरादेवीच्या विकासासाठी शिंदे गटात जाण्याचा सल्ला धर्मगुरुंनी दिला. त्यामुळे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्याचं संजय राठोड नुकतंच म्हणाले होते.

संजय राठोड नेमकं काय म्हणाले?

संजय राठोड दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महत्त्वाचं वक्तव्य केलं. “जेव्हा राज्यात घडामोडी झाल्या पक्षात फूट पडली तेव्हा मी ठरवले होते आपण उद्धव ठाकरे यांना सोडून जायचे नाही. बाबू महाराज यांनी मला सांगितले, आपल्या पोहरादेवी गडाचा विकास करायचा असेल तर आपल्याला शिंदे गटासोबत जावे लागेल. त्यानुसार मी शिंदे गटात गेलो”, असं संजय राठोड म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“मला गुहावटीला जायचं नव्हतं. आमचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी जायला सांगितले. समाजासाठी मला जावे लागले. पोहरादेवीचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मला महाराजांनी सांगितले. आमच्या समाजाचे नेते हरिभाऊ राठोड केसीआरमध्ये गेले, मी त्यांना शुभेच्छा दिल्या”, असंही ते म्हणाले.

“संख्याबळ ज्याचा तो मुख्यमंत्री होईल. या सरकारमधून समाजाचे अनेक विकास कामे मार्गी लागली. पोहरादेवीचा देखील विकास होणार आहे”, असा दावा संजय राठोड यांनी केला.

संजय राठोड यांच्या मनात नेमकं काय?

संजय राठोड एकीकडे आपल्याला उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नव्हती, असं सांगत आहेत. दुसरीकडे समाजासाठी आपण शिंदे गटासोबत जाण्याचं ठरवलं, असं ते म्हणत आहेत. तर पडद्यामागे वेगळंच काहीतरी घडत आहेत. ते आज थेट दिल्लीत दाखल झाले आहेत. ते अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमक्या घडामोडी काय घडतात याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.