Santosh Bangar : संतोष बांगर यांना वरणात सापडल्या अळ्या; आता काय ‘त्यांच’ खरं नाही
बांगर यांनी स्वत:च मध्यान्ह भोजनाची तपासणी केली. यावेळी त्यांना मध्यान्ह भोजनामध्ये दिल्या जाणाऱ्या वरणात अळ्या सापडल्या आहेत.

रमेश चेंडके, tv9 हिंगोली : शिवसेनेचे हिंगोलीतील बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मध्यान्ह भोजनाचा निकृष्ट दर्जा बांगर यांनी पुन्हा एकदा उजेडात आणला आहे. यावेळेस बांगर यांनी स्वत:च मध्यान्ह भोजनाची तपासणी केली. यावेळी त्यांना मध्यान्ह भोजनामध्ये दिल्या जाणाऱ्या वरणात अळ्या सापडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी बांगर यांना एका उपहार गृहात निकृष्ट दर्जाचे अन्न सापडले होते. तेव्हा संतोष बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. यामुळे बांगर चांगलेच चचर्ते आले होते.
उपहार गृहात दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा पर्दाफाश केल्यानंतर बांगर यांनी आता मध्यान्ह भोजना दिल्या जाणाऱ्या जेवणातील निकृष्ट दर्जा उघडकीस आणला आहे.
बुधवारी बांगर यांनी माध्यान्ह भोजनाची ग्रामीण भागातून जाणारा वाहनाचा ताफा अडवला. बांगर यानी स्वत: मध्यान्ह भोजनाच्या मेनूची तपासणी केली.
वरण, भात, भाजी सह सर्व परार्थांची त्यांनी तपासणी केली. तपासणी दरम्यान वरणात आळ्या आढळून आल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला आहे.
माध्यान्ह भोजनात मेनू प्रमाणे पदार्थ दिले जात नसल्याचे संतोष बांगर यांच्या चौकशीत दिसून आलं आहे. जेवणात दिल्या जाणाऱ्या पोळ्या संपूर्ण करपलेल्या असल्याचे सुद्धा दिसून आले.
निकृष्ट दर्जाचे जेवण दिलं जात असल्याचा आरोप आमदार बांगर यांनी केला आहे. गोरगरिबांना दिल जात असलेलं निकृष्ट दर्जाच जेवण बंद करून त्याच्या बदल्यात गोरगरीबांच्या अकाउंट वर ते पैसे द्यावेत अशी मागणी आमदार बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली होती.