Kirit Somaiya :…तर आम्हाला सत्तेची पर्वा नाही, सोमय्यांविरोधात शिंदे गटातील आमदार आक्रमक, उद्धव ठाकरेंना माफिया बोलण्यावरून वाद
त्या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरून आता शिवसेना आमदारांनी थेट आम्हाला सत्तेची परवा नाही, असाच इशारा दिलाय. तर सोमय्या यांची फडणवीस त्यांच्याकडे ही तक्रार केली आहे.
मुंबई : भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या नव्या सरकारची नवी चूल मांडून काही दिवसच झाले आहेत. आधीच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आमचं पटत नाही. आम्हाला निधी मिळत नाही. आमची काम होत नाहीत. म्हणत एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 40 आमदारांनी महाविकास आघाडीची साथ सोडली आणि भाजपशी घरोबा केला. त्यानंतर आता एका विचाराचे दोन गट एकत्र आल्याने आता तरी किमान सुखाचा संसार चालेल अशी अपेक्षा सर्वांना लागली होती. मात्र शिवसेनेवर टीका करण्यात आघाडीवर असणारे भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यामुळे या सुखी संसारात पहिली वादाची ठिणगी पडली. किरीट सोमय्या यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर सोमय्याने एक फोटो पोस्ट केला. मात्र त्या फोटोला दिलेल्या कॅप्शनवरून आता शिवसेना आमदारांनी थेट आम्हाला सत्तेची परवा नाही, असाच इशारा दिलाय. तर सोमय्या यांची फडणवीस त्यांच्याकडे ही तक्रार केली आहे.
कोणत्या ट्विटवरून वाद पेटला
मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हाठविल्या बदल अभिनंदन केले @NeilSomaiya@BJP4Maharashtra pic.twitter.com/Z0oe7kSFta
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 7, 2022
संजय गायकवाड म्हणतात सत्तेची परवा नाही
बुलडान्याचे शिवसेना-शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे, किरीट सोमय्यांनी असे काही समजू नये की आता शिवसेना संपली , ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजपा – शिवसेना युती म्हणून काम करतोय, आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब ,उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समझ किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये व यापुढे त्यांनी असे वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही, असा इशाराच संजय गायकवाड यांनी दिला आहे. यामुळे मात्र भाजपा व शिंदे गटात ही मतभेद आता चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र आहे.
अब्दुल सत्तार यांचाही सोमय्यांना इशारा
किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांनी माफिया बोलले आहेत. हे चुकीच आहे. असं बोलणं किरीट सोमय्या यांनी उचित नाही, मात्र त्यांच्याबाबत मी काही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. तर दीपक केसरकर यांनीही यावरून आक्षेप घेतला आहे. गेल्या काही दिवसात किरीट सोमय्या हे ठाकरेंवर सतत हल्लाबोल चढवत आहेत. मात्र तिच वक्तव्य आता युतीतील वादाला कारण ठरत आहेत.