Rane पिता-पुत्रांचा राजकीय इन्श्युरन्स संपलाय, विनायक राऊतांची खोचक टीका
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे पितापुत्रांवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांचा राजकीय इन्श्युरन्स संपलाय तो त्यांनी सांभाळावा, अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
मुंबई: शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे पितापुत्रांवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे (narayan rane), नितेश राणे आणि निलेश राणे यांचा राजकीय इन्श्युरन्स संपलाय तो त्यांनी सांभाळावा, अशी खोचक टीका विनायक राऊत (vinayak raut) यांनी केली आहे. नारायण राणे यांना दीर्घायुष्य लाभो. पण मोदी कृपेने मिळालेलं मंत्रीपद हे जनतेसाठी वापरावं. त्यांनी जनतेला योग्य प्रकारे मदत करावी. नाहीतर हे मंत्रीपद स्वाहा करतील, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बवरही टीका केली. फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब फुसका बार आहे, असं ते म्हणाले. मी पुन्हा येईन… पुन्हा येईन… असं देवेंद्र फडणवीस म्हणत असतील. माझ्या त्यांना होळीच्या शुभेच्छा आहेत. तसेच बुरा न मानो होली है, पण एक दिवस तरी चांगलं बोला, असा सल्ला मी भाजपवाल्यांना देईन, असा चिमटाही राऊत यांनी काढला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
विनायक राऊत यांनी यावेळी आघाडी सरकार भक्कम असल्याचं स्पष्ट केलं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कायम राहणार आहे. तसेच यापुढील काळातही राज्यात ठाकरे सरकारचा येणार आहे, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
काही झालं तरी भाजप येणार नाही
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही राज्यात ठाकरे सरकारच येणार असल्याचं म्हटलं आहे. भाजपला वाटत असेल केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जाईल. खोटे आरोप, चिखलफेक करून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार आणि नेत्यांचं मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही मजबूत आहोत. काल शरद पवार यांनी विश्वास दिलेला आहे. घाबरू नका. मी पुन्हा महाराष्ट्रात भाजपला येऊ देणार नाही. ही पवारांची भूमिका फक्त राष्ट्रवादीची नाही, ती महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी तरुण आमदारांसमोर भूमिका मांडली आहे. भाजपमधील आमचे मित्रं रोज तारखा देत आहेत. रोज रंग उधळत आहेत. ते नकली रंग आहेत. अशा नकली रंगांवर केंद्रीची बंदी आहे. काल त्यांना पवारांनी उत्तर दिलं आहे. काही झालं तरी महाराष्ट्रात भाजप येणार नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.
संबंधित बातम्या:
VIDEO: GOA काय आहे हे देवेंद्र फडणवीसांना लवकरच कळेल, संजय राऊतांचा टोला
भाजपचा शिमगा रोज सुरू आहे, आम्ही शिमगा सुरू केला तर…; sanjay raut यांचा भाजपला इशारा