शिंदे गटात प्रवेश म्हणजे फक्त फुसका बार, ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखांनी शिंदे गटाला थेट सुनावलं
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिंदे गटात नाशिकमध्ये फार मोठे प्रवेश झालेले नाहीत. एक खासदार आणि दोन आमदार वगळता कुठलाही मोठा चेहरा शिंदे गटात गेलेला नाही.
चंदन पूजाधिकारी, नाशिक : नाशिकमधील शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात पक्षप्रवेशावरून वाद सुरू आहे. ठाकरे गटाचे 12 नगरसेवक हे शिंदे गटात जाणार अशा चर्चा सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री यांच्यासोबत डिनर डिप्लोमसी होईल आणि त्यानंतर पक्षप्रवेश होईल अशी चर्चा सुरू आहे. त्यातच गुवाहाटी वरुन मुख्यमंत्री आल्यावर नाशिकमधील पक्षप्रवेश होणार असल्याचीही चर्चा सुरू झाली होती. मात्र, यावर ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच चिमटे काढले आहे. संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे वावड्या उठवत आहे. शिंदे गटात ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा प्रवेश म्हणजे फुसका बार असल्याचे देखील सुधाकर बडगुजर यांनी म्हंटले आहे. पदधिकाऱ्यांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण करण्याचे काम होत असले तरी कुणीही शिंदे गटात प्रवेश करणार नाही असेही बडगूजर यांनी म्हंटले आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिंदे गटात नाशिकमध्ये फार मोठे प्रवेश झालेले नाहीत. एक खासदार आणि दोन आमदार वगळता कुठलाही मोठा चेहरा शिंदे गटात गेलेला नाही.
त्यातच शिंदे गटात तिन्ही महत्वाच्या नेत्यांची परिस्थिती पाहता तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी झाल्याची चर्चा नाशिकमध्ये बघायला मिळत आहे.
नाशिकमधील शिंदे गटाकडून अनेकदा ठाकरे गटातील नगरसेवक, पदाधिकारी फुटणार असून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या.
यावरच ठाकरे गटाकडून शिंदे गटाला चिमटे काढण्यात आले आहे. शिंदे गटात प्रवेश म्हणजे फक्त फुसका बार असल्याचे म्हंटले आहे, याशिवाय शिंदे गटात खासदार गेले म्हणजे पक्ष गेला असे होत नाही. असं बडगूजर यांनी म्हंटले आहे.
नाशिकमधील शिवसेनेच्या दोन्ही गटाची परिस्थिती पाहता अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून येत्या काळात प्रवेशाबाबत काय घडामोडी होतात हे बघनं महत्वाचे ठरणार आहे.