सर्वात मोठी बातमी, शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्याआधी पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल लागणार?

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकणावर आता सुप्रीम कोर्टात लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने याआधी विधानसभा अध्यक्षांना याबाबत सुनावणी घेऊन निकाल देण्याचा आदेश दिला होता. पण विधानसभा अध्यक्षांच्या निकालास ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात पुन्हा आव्हान दिलं आहे. याच प्रकरणी आता लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे.

सर्वात मोठी बातमी, शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्याआधी पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल लागणार?
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्याआधी पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल लागणार?
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 4:27 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही काहीही घडू शकतं. कारण विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक फटका बसला आहे. तर महाविकास आघाडीला सर्वात चांगलं यश मिळालं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीनही घटकपक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज कुटुंबासह दिल्लीला रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे यांचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात ते काँग्रेस, आप आणि टीएमसी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना भेटणार आहेत. ठाकरेंच्या या दौऱ्यात कदाचित काँग्रेसच्या हायकमांडसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना आता सुप्रीम कोर्टातही मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्याने सुप्रीम कोर्टाला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देणं अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे येत्या 14 ऑगस्टला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. यावेळी काय घडू शकतं, याबाबत वकील असीम सरोदे यांनी सर्वात मोठा दावा केला आहे.

असीम सरोदे यांचा नेमका दावा काय?

“शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या 14 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत शिवसेना पक्ष आणि चिन्हं संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी मोठा दावा केला आहे. येत्या 14 ऑगस्टला सुप्रीम कोर्ट थेट निकाल देण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांना मिळेल. तर धनुष्यबाण चिन्ह हे गोठवलं जाईल”, असा मोठा दावा असीम सरोदे यांनी केली.

असीम सरोदे यांनी आणखी एक मोठा दावा केला. “शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी पक्षाचा निकाल लागेल. विधानसभा निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टाला तो निकाल लावावा लागेल. अन्यथा सुप्रीम कोर्टाची नाचक्की होईल, असं मोठं वक्तव्य असमी सरोदे यांनी केलं. “शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण जाणूनबुजून लांबणीवर टाकलं जातंय का? हा प्रश्न आहे”, असंदेखील मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.