उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेना ठाकरे गटाचा नेता अजितदादांच्या गळाला

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना नांदेडमध्ये देखील मोठा धक्का बसला आहे. नेत्यानं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, शिवसेना ठाकरे गटाचा नेता अजितदादांच्या गळाला
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 5:55 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहे. पुण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता नांदेडमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या  पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माधव पवाडे आणि माजी आ अविनाश घाटे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे आणि माजी आमदार अविनाश घाटे यांनी शिवबंधन तोडत घड्याळ हाती घेतलं आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार , आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आमदार चिखलीकर यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटात इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्याचा प्रवेश  

दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटासोबतच भाजपच्या पदाधिकाऱ्यानं देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाला पुण्यात धक्का 

दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला पुण्यात देखील मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुणे महापालिकेत शिवसेनेचे दहा नगरसेवक होते, एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा त्यातील एका नगरसेवकाने शिंदे यांना पाठिंबा दिला, तर नऊ नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. दरम्यान त्यातील आता पाच जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे चारच नगरसेवक राहिले आहेत.

भाजपमध्ये अंतर्गत नाराजी? 

मात्र समोर आलेल्या माहितीनुसार या माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी वाढल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.