ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी अक्षरश: रडले, भूमिका मांडताना कंठ दाटून आला

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. त्यांची एसीबीकडून चौकशी सुरु आहे. असं असताना आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचले. या घटनेमुळे राजन साळवी अस्वस्थ झालेत.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी अक्षरश: रडले, भूमिका मांडताना कंठ दाटून आला
आमदार राजन साळवी
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 6:01 PM

रत्नागिरी : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची सध्या एसीबी चौकशी सुरू आहे. त्यानुसार त्यांच्या रत्नागिरी शहरातील घराचं देखील आज मूल्यांकन करण्यात आलं. एसीबीने दिलेल्या नोटिसीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे मूल्यांकन केलं. यावेळी राजन साळवी यांना आपल्या भावना अनावर झाल्या. दरम्यान या साऱ्या गोष्टीबद्दल बोलत असताना त्यांना अश्रू देखील अनावर झाले. बांधकाम विभागाच्या कृतीवर बोलताना त्यांचा कंठ दाटून आला.

“हे घर मोठ्या कष्टाने उभारले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने केलं गेलेलं मोजमाप वेदनादायी होतं”, अशा भावना साळवी यांनी बोलून दाखवल्या. शिवाय दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे रडायचं नाही आता लढायचं, असा निर्धार देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवला. राजन साळवी यांच्या घरी अधिकारी मोजमाप करण्यासाठी आले त्यावेळी ते देवपूजेला बसलेले होते.

राजन साळवी नेमकं काय म्हणाले?

“माझ्यासमोर मी उभं केलेल्या माझ्या घराचं आज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजमाप केलं. मी त्यांना घरातील हॉल, किचनमध्ये, बेडरुममध्ये येऊन मोजमाप करताना पाहिलं. आम्ही ज्या गोष्टी उभ्या केल्या त्याचं मोजमाप घेताना पाहिलं. या गोष्टीचं खूप वाईट आणि दु:ख वाटलं. जसं चित्रपटात पाहतो की, एखादं घर लिलावत जाण्याआधी त्याची आधी जप्ती होते, त्याचं मोजमाप केलं जातं. त्याच पद्धतीने मोजमाप घडताना पाहिलं”, असं राजन साळवी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“माझ्या घरावर 25 लाखांचं कर्ज आहे. त्याचा मी हप्ता व्यवस्थित भरतोय. पण गलिच्छ राजकारणामध्ये माझ्या घराचं लिलावासारखं मोजमाप करण्यात आलं. या गोष्टीचं दु:ख मला होतंय. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. ज्या पद्धतीने मला मानसिक त्रास दिला जातोय त्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय दु:खी आहेत”, अशा भावना राजन साळवी यांनी व्यक्त केल्या.

“माझा विश्वास आहे, आतापर्यंत जे मी कमवलं ते मी माझ्या व्यवसायातून उभं केलेलं आहे. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. माझ्या मागे लागलेला हा चौकशीचा ससेमिरा आगामी काळात दूर होईल, अशी आशा बाळगतो. शासनाच्या वतीने कर्मचारी आले त्यांनी घराचं मोजमाप घेतलं तो त्यांचा अधिकार आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.