‘…तर तानाजी सावंत यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही’, विनायक राऊत यांची विखारी टीका

खासदार विनायक राऊत यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे. "तानाजी सावंत जो बडेजाव करत आहेत तो नितांत खोटा होता, धादांत खोटा होता", असं विनायक राऊत म्हणाले आहेत.

'...तर तानाजी सावंत यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही', विनायक राऊत यांची विखारी टीका
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 5:31 PM

मुंबई : “शिवसेना नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) हा जो दुतोंडी माणूस आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा वाळवी उठवली होती की, पंढरपूरची सभा सात लाखांची झाली. बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभेपेक्षा मोठी सभा झाली. पंढरपूरच्या सभेला स्वतः मी होतो. धाराशिवपासून सर्व परिसर फिरून काढला होता आणि शेवटच्या दोन दिवसांत त्याने सभेतून पळ काढला होता. ते कोणत्या कारणासाठी हे सांगितले तर तोंड दाखवायलाया जागा राहणार नाही”, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला. “तानाजी सावंत जो बडेजाव करत आहेत तो नितांत खोटा होता, धादांत खोटा होता”, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

बेईमानी ज्यांच्या मनात भरली, गद्दारी ज्यांच्या मनात भरली आहे, त्यापेक्षाही दुसरं काय करणार आहे? काल स्वार्थासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडे आले. संधी साधूपणा करत पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेले. चौथ्या डबक्यात सुद्धा उडी मारायला कमी करणार नाही. तानाजी सावंत यांची बकवासगिरी ही आम्हालाही काही नवीन नाही, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला.

महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या 2 एप्रिलला सभा आयोजित करण्यात आली आहे. याबाबतही विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीची महासभा 2 एप्रिलला होणर आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने लोकं येतील. सध्याच्या सरकारकडून हे शहर अशांत ठेवावं, कायदा व सुव्यवस्था बिघडावी म्हणून सरकार पुरस्कृत हा राडा आहे. पण कितीही राडा झाला तरी सभेवर कोणताही परिणाम होणार नाही”, असं विनायक राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तानाजी सावंत यांचा जुना व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, तानाजी सावंत यांचा एक जुना व्हिडीओ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात येतोय. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं तेव्हा ती बंडाची संकल्पना आपली होती, असं तानाजी सावंत म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांपू्र्वी आणखी एक मोठं विधान केलेलं. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आपण शिवसेनेच्या आमदारांचं काऊन्सिलिंग केलं होतं. त्यासाठी तब्बल दीडशे बैठका आपण दोन वर्षात घेतल्याचा दावा सावंतांनी केला. पण सावंत जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा त्यांनी एक व्हिडीओ जारी केलेला. त्या व्हिडीओत ते आपल्याला सत्तांतराबद्दल काहीच माहिती नव्हतं, असं बोलताना दिसत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.