Sushma Andhare | 40 जणांचं डिपॉझिट वाचवायची याची तयारी ठेवा, सुषमा अंधारे यांचं एकनाथ शिंदे यांना आव्हान

शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जाहीर सभेत शिंदेंपासून ते सोमय्या यांच्यापर्यंत सर्वांचाच चांगला समाचार घेतला.

Sushma Andhare |  40 जणांचं डिपॉझिट वाचवायची याची तयारी ठेवा, सुषमा अंधारे यांचं एकनाथ शिंदे यांना आव्हान
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 7:15 PM

खेड | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुणे पोटनिवडणुकीच्या ऑनलाईन प्रचारावरुन टीका केली होती. सत्ता गेल्यानंतर वाटलं होतं की लाईनीवर येतील, पण हे अजूनही ऑनलाईनच आहेत, असं शिंदे म्हणाले होते. शिंदेंच्या या टीकेला उबाठा गटाच्या डॅशिंग उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. तसेच तुमच्या 40 आमदारांचं डिपॉझिट वाचवायची तयारी ठेवा, असं आव्हान ही यावेळेस अंधारे यांनी शिंदे यांना दिलं. सुषमा अंधारे या उबाठा गटाच्या खेडमधील जाहीर सभेत बोलत होत्या.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

” एकनाथ भाऊ कसब्याच्या पोटनिवडणुकीत पक्षप्रमुखांनी ऑनलाईन 2 मिनिटांचा संदेश दिला होता. तरीही विजय झाला आहे. आता ते विभागवार सभा घेणार आहेत. तेव्हा तुमच्या 40 जणांची डिपॉझिट कशी वाचवायची, याची तयारी तुम्ही ठेवा”, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकवरुन उत्तर दिलं.

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला होता. शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख, जुने नेते असा केला. तसंच गुरुवारच्या ऑनलाईन भाषणावरुन निशाणाही साधला. सत्ता गेल्यावर लाईनवर येतील असं वाटलं होतं. पण ऑनलाईनच आहेत, अशी बोचरी टीका शिंदेंनी केली होती.

हे सुद्धा वाचा

दरम्यान या सभेला माजी खासदार आणि नेते अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, सचिव खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, उपनेते आमदार राजन साळवी, माजी पालकमंत्री रवींद्र वायकर, अॅड. अनिल परब, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि विलास चाळके उपस्थित होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.