Uddhav Thackeray | एक काळी टोपीवाला होता…., उद्धव ठाकरे यांचा कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेडमधील जाहीर सभेतून राज्य सरकारवर विविध मुद्यांवरुन जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray | एक काळी टोपीवाला होता...., उद्धव ठाकरे यांचा कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 8:44 PM

खेड | उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपाल असताना अनेकदा सावित्रीबाई आणि महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली होती. हा दोरा धरुन उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला. उद्धव ठाकरे हे खेडमधील गोळीबार मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“एक काळी टोपीवाला होता, गेला. त्याने शिवाजी महाराज यांचा अपमान केला, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. तरीही यांच्या शेपट्या बाहेर येत नाहीत. दिल्लीसमोर शेपटी आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, कदापी नव्हते”, असं उद्धव यांनी ठणकावून सांगितलं.

हे सुद्धा वाचा

ठाकरेंचं शिंदेना आव्हान

“जर तुम्हाला गर्व असेल, की आम्ही म्हणजे शिवसेना, आम्ही शिवसेना बांधली, तर घ्या स्वीकारा आव्हान. शिवसेना हे नाव बाजुला ठेवा आणि तुमच्या आई-वडिलांचं नाव लावा जर त्यांना लाज वाटत नसेल तर आणि पक्ष बांधून दाखवा”, असं थेट आव्हान ठाकरे यांनी यावेळेस शिंदेंना दिलं.

“दोघांना म्हणजे तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची आणि तुमच्या आई-वडिलांना तुमचं नाव वापरायची लाज वाटत नसेल, तर नाव लावा. मी तर उघडउघड बाहेर पडलोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय ते होऊन जाऊद्या”, असंही ठाकरे यांनी ठासून सांगितलं.

“नाव काय गोठवलं, चिन्ह काय गोठवलं, चिन्ह बदललं तरी आपण जिंकलो अंधेरीला. बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय? कधी ऐकलेत?बरं यांच्यातले असेही आहेत ज्यांनी बाळासाहेबांना जवळून पाहिलेलं सुद्धा नाही, ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार. ज्यांची राजकीय कारकीर्द गेल्या 10-15 वर्षात बहरली, तुमच्या सर्वांच्या कर्तुत्वाने कारकीर्द फुलली ते आपल्याला शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार शिकवणार?”, असा सवालही या उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

“बाळासाहेबांचे विचार काय आहेत, ज्यावेळा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा राज्यात उद्योगधंदे येत होते. हे गद्दार तिथे जाऊन मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या डोळ्यादेखत राज्याबाहेर उद्योग जाऊ लागले. हे उद्योग बाहेर जाऊ देणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत का?”, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.