दादा भुसेंची जवळीक नडली, ठाकरे गटाने केली माजी नगरसेवकाची हकालपट्टी

| Updated on: Oct 19, 2022 | 9:53 PM

21 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते, त्यावेळी उद्धव ठाकरे गटाचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

दादा भुसेंची जवळीक नडली, ठाकरे गटाने केली माजी नगरसेवकाची हकालपट्टी
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात जाण्याच्या हालचाली लक्षात घेतात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून माजी नगरसेवकांना कोंडी पकडले जात आहे. शिंदे गटाशी जवळीक ओळखून पक्षाला सोडचिठ्ठी करण्याच्या तयारीत असलेल्या श्याम साबळेंची ठाकरे गटाने हकालपट्टी केली आहे. नाशिकमधील अनेक ठाकरे गटाचे शिवसैनिक हे ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचे पाहून इतरांना धक्का देण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक श्याम साबळे यांची ठाकरे गटाने हकालपट्टी केली आहे. या पक्ष कारवाईने नाशिकमधील शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली असून साबळेंच्या हकालपट्टी चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी पक्षप्रवेश केला होता, त्यात त्यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

त्यातच आता प्रवीण तिदमे हे दहा ते बारा माजी नगरसेवक प्रवेश घडवून आणणार असल्याची चर्चा होती, त्यात श्याम साबळे यांचाही समावेश असल्याची चर्चा होती.

हे सुद्धा वाचा

21 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते, त्यावेळी उद्धव ठाकरे गटाचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आपल्याला सुरुंग लावण्याआधीच हकालपट्टीची कारवाई करत धक्कातंत्र वापरल्याने मोठी चर्चा आहे.

बंडखोरांना उद्धव ठाकरे गटांने संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत ठाकरेंचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातूनच घोषणा करण्यात आली आहे.

एकूणच उद्धव ठाकरे गटाकडून उचललेलं हे पाऊल धोक्याची घंटा ठरू शकते, अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याने नाराजी पसरू शकते.