राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा राजीनामा

सकाळी सव्वा अकराच्या सुमारास  शिवेंद्रराजे (Shivendra Raje Bhonsle) विधानभवनात दाखल झाले. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आज राजीनामा सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा राजीनामा
Follow us
| Updated on: Jul 30, 2019 | 1:57 PM

मुंबई/सातारा :  साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास  शिवेंद्रराजे (Shivendra Raje Bhonsle) विधानभवनात दाखल झाले. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.  त्यामुळे राष्ट्रवादीला आणि पर्यायाने पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे शिवेंद्रराजे उद्याच भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवेंद्रराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात निर्माण झालेल्या वादामुळे शिवेंद्रराजे नाराज आहेत. त्यातच ते पक्षाचा मुलाखतीसाठीही उपस्थित नव्हते. माझ्या मतदारसंघातील हित ज्या पक्षात असेल त्या पक्षात मी असेन असा सूचक इशारा त्यांनी काही दिवसापूर्वीच दिला होता. शिवाय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही दोन्ही राजेंमधील वाद मिटवण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र पवारांची मध्यस्थी अपयशी ठरल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादीने जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवले होते. त्यानुसार 13 इच्छुकांनी ऑफलाईन, तर काही इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. त्यामध्ये मात्र पक्षाच्या विद्यमान आमदारांपैकी केवळ शिवेंद्रराजे भोसले यांचाच अर्ज दाखल झालेला नसल्यामुळे सातारा, जावळीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही बुचकळ्यात पडले होते.

गेल्या कित्येक दिवसांपासून आमदार शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्याबाबत बोलताना ज्या पक्षांमध्ये जनतेच्या विकासाचे हित असेल आणि जो पक्ष मोठा असेल त्या पक्षात मी प्रवेश करणार. सध्या मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचेही शिवेंद्रराजेंनी सांगितले.

संबंधित बातम्या  

शिवेंद्रराजेंनी उमेदवारी अर्जच भरला नाही, अजित पवारांच्या दौऱ्याकडेही पाठ    

शरद पवार वाद मिटवणार, शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंना एकत्र बसवून तोडगा काढणार  

जिथे हित असेल तिथे मी जाणार, आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचं सूचक विधान    

शरद पवार म्हणाले शिवेंद्रराजे पक्षातच, पण काही तासातच भाजप प्रवेशाच्या हालचाली 

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.