VIDEO: तर उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच ‘I Love You’ चा मेसेज पाठवावा लागेल, व्हॅलेंटाईन डे निमित्त शिवेंद्रराजेंची कोपरखळी

भाजपचे आमदार शिवेंद्र राजे भोसले आणि भाजपचेच खासदा उदयनराजे भोसले एकाच पक्षात असूनही दोघांमधूनही विस्तव जात नाही. संधी मिळताच दोन्ही नेते एकमेकांना टोला लगावल्या शिवाय राहत नाहीत.

VIDEO: तर उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच 'I Love You' चा मेसेज पाठवावा लागेल, व्हॅलेंटाईन डे निमित्त शिवेंद्रराजेंची कोपरखळी
र उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच 'I Love You' चा मेसेज पाठवावा लागेल, व्हॅलेंटाईन डे निमित्त शिवेंद्रराजेंची कोपरखळी
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 4:33 PM

सातारा: भाजपचे आमदार शिवेंद्र राजे भोसले (Shivendra Raje Bhosle) आणि भाजपचेच खासदा उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) एकाच पक्षात असूनही दोघांमधूनही विस्तव जात नाही. संधी मिळताच दोन्ही नेते एकमेकांना टोला लगावल्या शिवाय राहत नाहीत. साताऱ्यातील  (Satara) राजकीय वर्चस्वावरून या दोन्ही नेत्यांमध्ये कायम टशन असते. आता तर नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने हे दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. थोडी जरी संधी मिळाली तरी हे दोन्ही नेते एकमेकांवर पलटवार करतात. आता हेच पाहा ना, आज व्हॅलेंटाईन डे आहे. म्हणजे प्रेमाचा दिवस आहे. आजच्या दिवशी प्रेमानं बोलायचं सोडून या दिवसाचं निमित्त साधूनही या नेत्यांची एकमेकांवर टोलेबाजी सुरू आहे. माझ्याकडे उदयनराजेंचा नंबर नाही. त्यांच्या ड्रायव्हरच्या नंबरहून ते मला फोन करतात. त्यांना प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल तर त्यांच्या ड्रायव्हरलाच आय लव्ह यूचा मेसेज पाठवावा लागेल, असं शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणत उदयनराजेंना टोला लगावला आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आज व्हॅलेंटाईन डे असल्याने तुम्ही उदयनराजेंना शुभेच्छा पाठवल्या का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी कोटी केली. माझ्याकडे त्यांचा नंबर नाही. मला ते नेहमी त्यांच्या ड्रायव्हरच्या फोनवरून फोन करतात. माझ्याकडे त्यांच्या ड्रायव्हरचाही नंबर सेव्ह नाही. त्यामुळे शुभेच्छा दिल्या नाहीत. शुभेच्छा द्यायच्याच झाल्या तर मला त्यांच्या ड्रायव्हरलाच आय लव्ह यूचा मेसेज पाठवावा लागेल. मग तो मला कळवेल, अशी मिष्किल टिप्पणी शिवेंद्रराजे यांनी केली. त्यामुळे एकच खसखस पिकली.

एकमेकांवर आरोप सुरू

यावेळी त्यांनी इनोव्हेटिव्ह सातारा या योजनेवरही टीका केली. त्यांचं पाच वर्षातील काम सातारकरांनी पाहिलं आहे. सातारा विकास आघाडीबाबत भयंकर नाराजी आहे. विरोधकांनी आरोप करायच्या ऐवजी यांचेच नगरसेवक यांच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप करत आहेत. कुणी किती पैसे खाल्ले, घंटागाडीवाल्यांकडून काय घेतलं? कचरा डेपोत कोणी डल्ला मारला? हे आरोप त्यांच्यातच सुरू आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात इनोव्हेटिव्ह सातारा, अमूक सातारा तमूक सातारा सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला.

खिसे भरायचे काम सुरू आहे

निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे अब्जावधी रुपये साताऱ्यात येत आहेत. सातारकरांनी केवळ ते पेपरातच पाहावेत. त्यातूनच हे पैसे परत जाणार आहे. पाच वर्ष संधी देऊनही साताऱ्यात काही झालं नाही. नगरपालिका ही भ्रष्टाचाराची कुरण झाली आहे. नुसतं तिथे चरायचं आणि आपले खिशे भरायचे सुरू आहेत. पराभव दिसतोय म्हणून नौटंकी सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

निवडणुकीनंतर योजना गुंडाळणार

इनोव्हेटिव्ह सातारा ही केवळ वातावरण निर्मिती आहे. इकडून योजना आली, तिकडून योजना आली यावर विश्वास ठेवू नका, केवळ फोटोसेशन सुरू आहे. इनोव्हेटिव सातारा ही केवळ निवडणुकीपुरती योजना आहे. निवडणूक झाल्यावर योजना गुंडाळली जाणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : कुडाळमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये राडा, कार्यकर्ते भिडले

सांगलीत अफलातून निवडणूक, तरण्याबांड फळीला 80 वर्षांच्या आजी-आजोबांचे आव्हान, म्हणे पवारांसारखा करिश्मा करणार…!

Video | काँग्रेसचे घडीभराचे टशन खत्म; अन् ‘सागर’मध्ये हास्य, विनोद, गप्पांची मैफल सुरू…!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.