बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत – संजय राऊत

राज ठाकरे यांनी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची वारसा असल्याचे म्हटले आहे. शिंदे गट आणि भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी यावर प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंना मोदी-शहांचे समर्थन करण्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही त्यांनी आपले मत मांडले. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हा वारसा असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत - संजय राऊत
संजय राऊतांचे राज ठाकरेंवर टीकास्त्रImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 11:45 AM

शिवसेना ही काही शिंदेंची किंवा उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाही. धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच प्रॉपर्टी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवारांचच अपत्य आहे, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर टीकास्त्र सोडलं. डोंबिवलीतील पहिल्या सभेत राज ठाकरे यांनी सर्वांवरच जोरदार हल्ला चढवला. मात्र त्यांच्या याच विधानाचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

शिवसेना, शिवसैनिक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची जी प्रॉपर्टी आहे ती एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह यांचीच तळी राज ठाकरे उचलत आहेत. त्यांचा हल्ला मोदी-शहांवर पाहिजे. त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये, तर सभागृहात पाहून बोलावं. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे हे सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ज्या मोदी शहांनी बेकायदेशीरपणे शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली, त्याच भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात व्हावा यासाठी तुमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना कधीच माफ करणार नाहीत असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला. राज ठाकरे मूळ मुद्दा सोडून बोलत आहेत ते काय बोलत आहेत त्यावर महाराष्ट्र चालत नाही, असेही ते म्हणाले.

संजय राऊतांचे टीकास्त्र 

‘ आम्ही काय वेगळं सांगत होतो का ? ती प्रॉपर्टी बाळासाहेबांचीच आहे. शरद पवारांचंच अपत्य आहे राष्ट्रवादी. त्यांच्या हयातीत तो पक्ष अजित पवारांना देणारा निवडणूक आयोग कोण ? जनता, शिवसेना, शिवसैनिक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची जी प्रॉपर्टी आहे ती एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह कोण ? हाच आमचा सवाल आहे. आणि त्याच मोदी-शाहांची तळी राज ठाकरे उचलत आहेत.

राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही

त्यांचा हल्ला मोदी-शहांवर पाहिजे. त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये, तर सभागृहात पाहून बोलावं. ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी एकनाथ शिंदेंना परस्पर दिली. जशी मुंबई पोर्तुगिजांनी ब्रिटीशांना आहेर म्हणून दिली, त्याच पद्धतीने मोदी- शहा या दोन व्यापाऱ्यांनी बाळासाहेब ठाकऱ्यांची शिवसेना ही आहेर म्हणून देऊन टाकली. शिवसेना काय मोदी-शाहांच्या घरात निर्माण झाली होती का ? राज ठाकरेंनी या मुद्यावर बोलायला पाहिजे. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे हे सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

आज तुम्ही ( राज ठाकरे) त्यांचाच ( मोदी) प्रचार करत आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, फडणवीस, आज तुम्ही यांनाच आपले नेते मानत आहात. त्यांनीच ही बाळासाहेब ठाकरेंची, महाराष्ट्राच्या जनतेची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेंना दिली. त्याच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्रात करायला निघाला आहात, यासारखं दुसरं पाप नाही. आणि (त्यासाठी) बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत ‘ अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले.

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

वेगळ्या विचारांची युती आणि आघाडी होती. पण सर्वात लाजीरवाणी गोष्ट उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यानंतर बाळासाहेबांच्या पुढचं हिंदुहृदयसम्राट काढून टाकलं. काही ठिकाणी तर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलेलं मी पाहिलं. स्वत:च्या स्वार्थासाठी इतक्या खालपर्यंत गेले तुम्ही. सभापतींना तेव्हा सांगितलं होतं बाळासाहेबांचं एक चित्र विधानभवन आणि विधानपरिषदेच्या सभागृहात लावा. त्यांना कळेल आपण इथपर्यंत कोणामुळे आलो. हे इकडे बघत होते तिकडे ४० निघून गेले. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही आपले 40 आमदार गेले, असे राज ठाकरे डोंबिवतलीतील सभेत म्हणाले.

गद्दारी करणारे आधी मान खाली घालून जायचे. आता मात्र त्यांना काहीच वाटत नाही. मतांचा अपमान करुन देखील तुम्ही शांत बसत असेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला. शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरु केले. आता तर पक्ष आणि चिन्हच ताब्यात घ्यायचं. असं कधी पाहिलं नव्हतं. शिंदे आणि पवारांनी नाव आणि चिन्ह घेतलं. शिवसेना नाव हे उद्धव ठाकरे किंवा शिंदेची प्रॉपर्टी नाही. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माणसं पळवली जात आहेत, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली होती.

Non Stop LIVE Update
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा.
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा.
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?.
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?.
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले.
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.