shiv jayanti 2023 : या विद्यालयात 54 लाख प्रति तांदळातून साकारली शिवरायांची भव्य दिव्य प्रतिकृती
shiv jayanti sangli : तांदळाला अक्रालिक रंगाच्या माध्यमातून विविध रंगछटा देण्यात आल्या असल्याची माहिती शिक्षकांनी सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही विद्यार्थ्यांना बालवयातच मिळाली पाहिजे.
सांगली : कडेगाव तालुक्यातील (kadegaon) अमरापूर (amrapur village) या विद्यालयात 54 लाख प्रति तांदळातून शिवरायांची भव्य दिव्य प्रतिकृती साकारली आहे. त्याचबरोबर कला शिक्षक नरेश लोहार यांनी विद्यार्थ्यांसमवेत शिवरायांना अनोखे अभिवादन केले. आज शिवाजी महाराजांची (shiv jayanti 2023) जगभरात विविध देशात जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन सुध्दा केले जाते. आज राज्यभरात विविध जिल्ह्यात चांगल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केल्यामुळे परिसरात सगळीकडे चर्चा आहे.
54 लाख तांदळातून भव्य दिव्य प्रतिकृती
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील अमरापूर या विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तांदळाच्या माध्यमातून विद्यालयाचे उपक्रमशील कलाशिक्षक श्री नरेश लोहार यांच्या संकल्पनेतून तब्बल 54 लाख तांदळातून भव्य दिव्य प्रतिकृती साकारली आहे. शाळेत प्रतिकृती पाहायला नागरिकांची गर्दी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही विद्यार्थ्यांना बालवयातच मिळाली पाहिजे
कलाशिक्षक नरेश लोहार यांच्या समवेत विद्यालयातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी खूप मेहनत घेत 17 बाय 25 फुट या आकाराची प्रतिकृती अवघ्या 2 दिवसात 19 तासात पूर्ण केली आहे. तांदळाला अक्रालिक रंगाच्या माध्यमातून विविध रंगछटा देण्यात आल्या असल्याची माहिती शिक्षकांनी सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही विद्यार्थ्यांना बालवयातच मिळाली पाहिजे. स्वतः च्या कुटुंबाला विसरून मायेने हात फिरावणारे व स्वराज्य मिळवण्यासाठी धडपडणारे ते छत्रपती शिवाजी महाराज होते. याच प्रेरणेतून शालेय विद्यार्थ्यांनी शिवरायांचा आदर्श घ्यावा व प्रत्येक विद्यार्थ्यानी एक उत्तम कला जोपासवी अशी भावना व्यक्त करत ही प्रतिकृती साकारली असल्याचं नरेश लोहार यांनी सांगितलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगातील पहिली प्रतिकृती…
कलाशिक्षक नरेश लोहार यांनी दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साडे तीन हजार चौरस फुट या आकारांत 3221 वह्या पुस्तकांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगातील पहिली प्रतिकृती साकारताना अनोखे अभिवादन दिले होते. या दुसऱ्या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत असून विद्यार्थी व पालकांसाठी ही प्रतिकृती पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहे.